मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /लग्नावरुन Virat Kohli ला 'रावळपिंडी एक्सप्रेस' ने डिवचले, ट्विटर युजर्सनी शोएब अख्तरचा घेतला क्लास

लग्नावरुन Virat Kohli ला 'रावळपिंडी एक्सप्रेस' ने डिवचले, ट्विटर युजर्सनी शोएब अख्तरचा घेतला क्लास

Virat Kohli

Virat Kohli

पाकिस्तान संघाचा रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा शोएब अख्तरने(Shoaib Akhtar) विराट कोहलीला (Virat Kohli)त्याच्या खासगी आयुष्यावरुन डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र युजर्सनी त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

नवी दिल्ली, 25 जानेवारी: दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या पराभवानंतर (South Africa) विराट कोहली (Virat Kohli)आणि टेस्ट कॅप्टन्सी हा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. दरम्यान, पाकिस्तान संघाचा रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा शोएब अख्तरने(Shoaib Akhtar) विराट कोहलीला त्याच्या खासगी आयुष्यावरुन डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र युजर्सनी त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

एका मुलाखती दरम्यान अख्तरने विराट आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) या दोघांच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केले आहे. जर मी भारतात असतो आणि वेगवान गोलंदाज असतो तर मी लग्न केले नसते. मी क्रिकेटला फोकस केले असते. हा माझा विचार आहे. पण कोहलीचा हा खासगी प्रश्न आहे. पण मला विचारले असते तर मी माझ्या क्रिकेटवर लक्ष्य केंद्रीत केले असते.

अख्तरच्या या विधानानंतर, विरुष्काच्या चाहत्यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला. विशेष म्हणचे अख्तरचे हे वक्तव्य अनुष्काच्या चाहत्यांना आवडले नाही. 'लज्जास्पद. विराट कोहलीच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे एका युजरने म्हटले आहे. तर, पाकिस्तानमधील नागरिक आणि क्रिकेटच्या दयनीय स्थितीबद्दल त्यांनी बोलले पाहिजे. अशा कमेंट्स ट्विटर युजर्स करत आहेत.

लग्नानंतर महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देवसारख्या कर्णधारांनी क्रिकेटच्या मैदानात चांगली कामगिरी केली. याची देखील युजर्सनी आठवण करुन दिली. 'मी सांगतो. लग्नानंतर कपिलने वर्ल्डकप 83 जिंकला. लग्नानंतर धोनीने वर्ल्डकप 2011 जिंकला...” अशी कमेंट ट्विटर युजरने केली आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी डिसेंबर 2017 मध्ये लग्नगाठ बांधली. जानेवारी 2021 मध्ये त्यांच्या घरी नन्हा परीचे स्वागत झाले असून तिचे नाव वामिका असे आहे.

First published:

Tags: Shoaib akhtar, Virat kohli, Virat kohli and anushka sharma