मुंबई, 19 जून : अनुष्का शर्माने (Anushka Sharma) तिच्या मालदीव बीच व्हेकेशनमधील सुंदर क्षणांचा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ तिनं इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. अनुष्का अलीकडेच तिचा क्रिकेटर पती विराट कोहली (Virat Kohli) आणि मुलगी वामिकासोबत मालदीवमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. केशरी स्विमवेअर आणि काळ्या मोनोकिनीमध्ये स्वत: चे जबरदस्त फोटो शेअर केल्यानंतर आता अनुष्काने एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये ती तिच्या रिसॉर्टभोवती सायकल चालवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती मुलगी वामिकालाही (Vaamika) तिच्या मागे सायकलवर घेऊन जात असल्याचे दिसत आहे. मात्र, यातही वामिकाचा चेहरा दिसत नाही.
या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा गार्डन एरिया आणि रिसॉर्टच्या बीचवर सायकल चालवताना दिसत आहे. ती वेगवेगळ्या बीच वेअरमध्ये दिसत आहे. ती व्हिडिओमध्ये खूप खुष दिसत आहे. तिच्या हॅप्पीनेस अंदाज या व्हिडिओ कॅप्शनवरूनही लावता येऊ शकतो. पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबतच्या चांगल्या आठवणी तिने शेअर केल्या आहेत.
View this post on Instagram
व्हिडिओ शेअर करताना अनुष्का शर्माने लिहिले की, "माझ्या दोन प्रिय व्यक्तींसोबतच्या या सर्वोत्तम आठवणी, मला परत पेडल मारायला आवडेल!" अनुष्काने कॅप्शनमध्ये मिसिंग ऑलरेडी म्हणत खूप मिस करत आहे, असे म्हटले आहे. अनुष्काचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांनाही आवडला आहे. तिच्या कमेंट सेक्शनमध्ये भरपूर लव इमोजी पडल्या आहेत. अनेक चाहत्यांनी सुंदर आठवणी, खूप गोंडस, असं म्हटलं आहे.
अनुष्का शर्माचे मालदीवमधील सुट्टीतील फोटो -
याआधी अनुष्का शर्माने काळ्या स्विमसूटमध्ये तिचे फोटो शेअर केले होते. इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर करत अनुष्काने लिहिले, "जेव्हा सूर्याने मला लाजवले." पहिल्या चित्रात, अनुष्का हॅट आणि वन-शोल्डर स्विमसूटमध्ये नोमेकअप लुक करताना दिसली. दुसऱ्या चित्रात अनुष्काने एक लांबलचक शॉट दिला, ज्यात पार्श्वभूमीत समुद्र, बीच आणि निळे आकाश दिसत होते.
हे वाचा - भारतीय क्रिकेटपटूने ठोकलं लागोपाठ दुसरं शतक, मैदानात पत्नीसाठी झळकावलं लव्ह लेटर
याआधी अनुष्का शर्मानं ब्लॅक स्विमसूटमध्ये सोलो फोटो शेयर केले होते. इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर करत अनुष्काने लिहले, सूर्य मला जणू लाजवत आहे." पहिल्या फोटोत, अनुष्का हॅट आणि वन-शोल्डर स्विमसूटमध्ये नोमेकअप लुकमध्ये दिसली. दुसऱ्या फोटोत अनुष्काने एक लांबलचक शॉट दिला, ज्यात मागे समुद्र, बीच आणि निळे आकाश दिसत होते.
हे वाचा - भाऊच झाला भावाचा वैरी! इंटरनॅशनल मॅचमध्ये भावानेच केलं जेसन रॉयला बोल्ड, Video
अनुष्का शर्माचा आगामी चित्रपट -
कामाच्याबाबतीत बोलायचे झाल्यास अनुष्का शर्मा शेवटी शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत आनंद एल रायच्या झिरोमध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. 'चकडा एक्स्प्रेस'मधून ती चित्रपटांमध्ये परतणार आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी अभिनेत्री सध्या खूप मेहनत घेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Virat anushka