मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

India vs England 2021: भारतीय अंपायर्ससाठी कोरोना काळात आली गुड न्यूज

India vs England 2021: भारतीय अंपायर्ससाठी कोरोना काळात आली गुड न्यूज

India vs England 2021

India vs England 2021

कोरोना काळ सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट होत आहे. IND vs England ह्यांच्यात 5 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी एकमेव सामना रेफरी म्हणून भारताचा पूर्वीचा वेगवान गोलंदाज असेल.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली,29 जानेवारी : बहुप्रतीक्षित असलेल्या आगामी भारत-इंग्लड क्रिकेट मालिकेपूर्वी (India -England Cricket Serise) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (ICC) पहिल्या दोन कसोटी सामन्यांकरिता (Test Match) होम अंपायर्सची नियुक्ती केली आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीच्या (Pandemic) पार्श्वभूमीवर क्रिकेट सामने काही काळ थांबवण्यात आले होते. आता हे सामने सुरु होणार असून परदेशातील अम्पायर्स खेळांचे संयोजन करीत आहेत. मात्र आता नुकत्याच झालेल्या घोषणेमुळे होम अम्पायर्स कसोटी सामन्यांमध्ये पुन्हा सहभागी होऊन असा नवा ट्रेंड सुरु होणार आहे.

अनिल चौधरी (Anil Choudhary) आणि वीरेंद्र शर्मा (Virendra Sharma) ही अम्पायर जोडी दोन देशांमधील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये सहभागी होणार आहेत. आयसीसीने गुरुवारी जाहीर केलं की एलिट पॅनेल अम्पायर्सपैकी (Elite Panel Umpaires) एकमेव भारतीय अधिकारी नितीन मेनन हे पदार्पणातच दोन्ही सामन्यांदरम्यान खेळपट्टीवर उभे राहतील. चौधरी आणि शर्मा हे आयसीसीच्या इंटरनॅशनल पॅनल आफ अम्पायर्सशी संलग्न आहेत. चौधरी हे पहिल्या कसोटी सामन्यात ग्राऊंडवर उतरतील तर दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये त्यांची जागा शर्मा हे घेतील. पहिल्या टेस्ट मॅचसाठीचे थर्ड अम्पायर सी. शमसुद्दीन हे पुढील सामन्यांसाठी आपला कार्यभार चौधरी यांच्याकडे सोपवतील. 5 आणि 13 फेब्रुवारीला अनुक्रमे होणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी भारताचे माजी फास्ट बालर जवागल श्रीनाथ (Javagal Shreenath) यांची एकमेव मॅच रेफ्री म्हणून निवड करण्यात आली आहे. 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या आणि अहमदाबाद येथे 4 ते 8 मार्च दरम्यान होणाऱ्या चौथ्या टेस्ट मॅचसाठी अधिकृत रोस्टर आफ इंडियाची घोषणा नंतर आयसीसीने केली आहे. व्हाईट बाॅलवर खेळवल्या जाणाऱ्या टेस्ट मॅचनंतर होणाऱ्या 5 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांमध्येही भारतीय पंच सहभागी होतील.

हे देखील वाचा -   IPL 2021 : आयपीएल लिलावात या खेळाडूंवर सगळ्या टीमची नजर, पैशांचा पाऊस पडणार!

सामान्य स्थिती न्यूट्रल अम्पायर धोरणाला जागतिक संघटना व्दिपक्षीय खेळासाठी प्राधान्य देतात. तथापि महामारीच्या पार्श्वभूमीवर उदभवलेली स्थिती आणि प्रवासाच्या प्रतिबंधित सुविधांमुळे हे धोरण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. यामुळे जगभरात चर्चांना उधाण आले आहे. याबाबत गतवर्षी वेस्ट इंडिजचा कसोटी कर्णधार जेसन होल्डरने (Jessan Holder) जर खेळाडूंना जैव-सुरक्षित वातावरणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले जाते तर एलिट अम्पायर्सना व्दिपक्षीय मालिकेसाठी प्रवास करण्यास परवानगी का दिली जात नाही, अशी विचारणा आयसीसीकडे केली होती. बांगलादेश (Bangladesh) आणि वेस्ट इंडिज (West indies) यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लडचे रिचर्ड इलिंगवर्थ यांची तटस्थ आन फिल्ड अम्पायर म्हणून नेमणूक करण्यात आली होती कारण यजमान बांगलादेशमधील एकही अम्पायर आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये नव्हते.

First published:

Tags: Ahmedabad, Corona, Cricket, Team indian, Test match