IPL 2021 : आयपीएल लिलावात या खेळाडूंवर सगळ्या टीमची नजर, पैशांचा पाऊस पडणार!

IPL 2021 च्या लिलावात जास्तीत जास्त लक्ष वेधून घेतील असे 10 खेळाडू येथे आहेत. आता कोणती टीम सर्वाधिक बोली लावून यांना आपल्या टीम मध्ये सामील करून घेइल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं.

IPL 2021 च्या लिलावात जास्तीत जास्त लक्ष वेधून घेतील असे 10 खेळाडू येथे आहेत. आता कोणती टीम सर्वाधिक बोली लावून यांना आपल्या टीम मध्ये सामील करून घेइल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं.

  • Share this:
चेन्नई,29 जानेवारी: आयपीएलच्या (IPL 2021) 14 व्या मोसमासाठीचा लिलाव (Auction) लवकरच होणार आहे. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होणार असून संघानी सोडलेले खेळाडू देखील या लिलावात उपलब्ध असणार आहेत. या सर्व खेळाडूंकडे सर्व संघाची नजर लागली असून 18 फेब्रुवारीला यासाठी चेन्नईमध्ये लिलाव पार पडणार आहे. पुढील वर्षी बीसीसीआय आयपीएलमध्ये (IPL) आणखी संघांची भर टाकणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर विविध संघ या लिलावात खेळाडूंची खरेदी करणार आहेत. त्यामुळे या लिलावात काय होते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. लिलावात या 10 खेळाडूंवर असणार सर्वांची नजर 1) स्टीव्ह स्मिथ: नुकतेच राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) स्मिथला(Steven Smith) संघातून मुक्त केलं आहे. कॅप्टन असलेल्या खेळाडूला राजस्थानने सोडल्याने सर्वांना चांगलाच धक्का बसला होता. पण ऑस्ट्रेलियाचा हा खेळाडू आपल्या कामगिरीने एकहाती मॅच जिंकून देऊ शकतो. यामुळं अनेक संघाची त्यावर नजर असणार आहे. या लिलावात त्याला किती किंमत मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 2) शिवम दुबे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने(RCB) मागील लिलावात मोठी किंमत मोजून त्याला खरेदी केलं होतं. परंतु त्याच्या किमतीच्या साजेशी कामगिरी करता न आल्यानं संघाने त्याला रिलीज केलं आहे. ऑलराऊंडर असलेल्या या खेळाडूला या लिलावात संघात घेण्यासाठी मोठी चढाओढ लागू शकते. यामुळे या लिलावात देखील त्याला मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. 3) ग्लेन मॅक्सवेल :मागील अनेक मोसमात ग्लेन मॅक्सवेल(Glen Maxwell) फ्लॉप जाताना दिसत आहे. त्यामुळे मोठी किंमत मोजून संघात घेतलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने(KXIP) यावेळी त्याला रिलीज केलं आहे. सर्वात स्फोटक असलेला हा ऑस्ट्रेलियन खेळाडू खूप उपयुक्त ठरू शकतो. यामुळे या लिलावात कोणता संघ मॅक्सवेलवर बोली लावतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 4) कृष्णप्पा गौतम :पंजाबने(KXIP) मागच्या वर्षी राजस्थानकडून या खेळाडूला ट्रेंडमध्ये घेतले होते. पण मागील मोसमात त्याला केवळ 2 मॅच खेळण्याची संधी मिळाली. आपल्या उपयुक्त बॅटिंग आणि बॉलिंगच्या बळावर तो टीमला मॅच जिंकून देऊ शकतो. त्यामुळे स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेल्या या खेळाडूकडे देखील सर्वांची नजर असणार आहे. 5) ख्रिस मॉरिस : दक्षिण आफ्रिकेचा हा ऑलराऊंडर खेळाडू देखील खूप महत्त्वाचा आहे. मागील मोसमात आरसीबीने (RCB) मोठी किंमत मोजत त्याला खरेदी केले होते. या मोसमात त्याने चांगली कामगिरी केली देखील. परंतु तरीही त्याला सोडण्यात आल्याने अनेक टीम त्याला घेण्यासाठी उत्सुक आहेत. शानदार ऑलराऊंडर खेळाडू असलेल्या मॉरिसला या लिलावात चांगली किंमत मिळण्याची शक्यता आहे. 6) नॅथन कुल्टर नाईल : ऑस्ट्रेलियाचा हा वेगवान बॉलर आपल्या बॉलिंगसाठी ओळखला जातो. मागील मोसमात मुंबई इंडियन्सने(MI) त्याला आपल्या टीममध्ये घेतलं होतं. परंतु किंमत जास्त असल्याने त्याला रिलीज करण्यात आलं आहे. यामुळे मुंबई इंडियन्स पुन्हा त्याच्यावर बोली लावण्याची शक्यता असून इतर टीमदेखील त्याला घेण्यास इच्छुक असणार आहेत. 7) जेम्स पॅटिन्सन :ऑस्ट्रेलियाचा हा वेगवान बॉलर मागील मोसमात मुंबई इंडियन्ससाठी(MI) महत्त्वाचा खेळाडू होता. टीममधील बुमरा आणि बोल्ट बरोबर त्याने शानदार कामगिरी करत मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे या लिलावात त्याच्यावर देखील मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. 8) टॉम करन :राजस्थान रॉयल्सकडून(Rajasthan Royals) मागील मोसमात खेळताना त्याला खूप कमी मॅच खेळण्याची संधी मिळाली होती. भाऊ सॅम प्रमाणेच टॉम देखील शानदार ऑलराऊंडर असून या लिलावात त्याला घेण्यासाठी अनेक टीम इच्छुक असतील. 9) जेसन रॉय : इंग्लंडचा स्फोटक ओपनर असलेला जेसन रॉय(Jeson Roy) मागील मोसमात दिल्लीकडे होता. पण तो या मोसमात न खेळल्यामुळे दिल्लीला त्याला रिलीज केलं आहे. स्फोटक ओपनिंगचा बॅट्समन असल्यामुळे रॉयवर या लिलावात चांगली बोली लागण्याची शक्यता आहे. 10) उमेश यादव :भारताचा वेगवान बॉलर असलेल्या उमेश यादवला(Umesh Yadav) आरसीबीने (RCB) आपल्या टीममधून रिलीज केलं आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जखमी होण्याआधी तो उत्तम फॉर्ममध्ये होता. त्यामुळे या लिलावात त्याला चांगली किंमत मिळण्याची शक्यता आहे. मागील काही मोसमात शानदार कामगिरी न केल्याने त्याच्याविषयी अनेक संभ्रम आहेत. परंतु अचूक टप्प्यावर बॉलिंग करत असल्यानं त्याला टीममध्ये घेण्यासाठी अनेकजण इच्छुक असणार आहेत.

हे देखील वाचा -   IND vs ENG: चेन्नई टेस्टपूर्वी इंग्लंडच्या क्रिकेटपटूचा टीम इंडियाला धोक्याचा इशारा!

Published by:Aditya Thube
First published: