मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL संपवून विमानाने दुसऱ्या देशात, 48 तासांमध्येच इंटरनॅशनल मॅचला मैदानात उतरला गुजरातचा चॅम्पियन!

IPL संपवून विमानाने दुसऱ्या देशात, 48 तासांमध्येच इंटरनॅशनल मॅचला मैदानात उतरला गुजरातचा चॅम्पियन!

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) पहिल्यांदाच खेळत असलेली गुजरात टायटन्स (Gujarat Titans) चॅम्पियन झाली. आयपीएल फायनलला 48 तास होत नाहीत तोच गुजरातचा चॅम्पियन खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.

मुंबई, 31 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) पहिल्यांदाच खेळत असलेली गुजरात टायटन्स (Gujarat Titans) चॅम्पियन झाली. रविवारी झालेल्या या सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेटने पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगला. आयपीएल फायनलला 48 तास होत नाहीत तोच गुजरातचा चॅम्पियन खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.

वेस्ट इंडिज आणि नेदरलँड (Netherland vs West Indies) यांच्यात अॅमस्टीलव्हीन इकडे पहिली वनडे खेळवली जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या टीममध्ये अल्झारी जोसेफ (Alzari Joseph) आहे. अल्झारी जोसेफने या सामन्यात 9 ओव्हरमध्ये 36 रन देऊन 1 विकेट घेतली. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर नेदरलँडने 45 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 240 रन केले. पावसामुळे मॅच 45 ओव्हरची करण्यात आली. डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे वेस्ट इंडिजला विजयासाठी 247 रनचं आव्हान मिळालं.

फायनलमध्ये जोसेफ बेंचवर

आयपीएलच्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सने टीममध्ये एक बदल केला होता. अल्झारी जोसेफऐवजी लॉकी फर्ग्युसनला या सामन्यात संधी देण्यात आली, पण जोसेफ टीमसोबत मैदानात होता, तसंच तो गुजरातच्या विजयानंतर सेलिब्रेशनमध्येही सहभागी झाला. विजयाचा जल्लोष केल्यानंतर जोसेफ सोमवारी नेदरलँडसाठी रवाना झाला आणि मंगळवारी मॅच खेळण्यासाठी उतरला.

First published:

Tags: Gujarat Titans, Ipl 2022