Home /News /sport /

'मॅच संपूदे, मग त्याला बघून घेतो,' लॉर्ड शार्दुलवर भडकला रोहित शर्मा

'मॅच संपूदे, मग त्याला बघून घेतो,' लॉर्ड शार्दुलवर भडकला रोहित शर्मा

शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) बरेच वेळा आपण बॉलच नाही तर बॅटनेही धमाका करू शकतो हे दाखवून दिलं आहे. टेस्टमध्ये शार्दुलच्या नावावर तीन अर्धशतकं आहेत. ही तीनही अर्धशतकं त्याने टीम इंडिया कठीण परिस्थितीमध्ये असताना केली आहेत. यातल्याच एका मॅचवेळी शार्दुलवर रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगलाच भडकला होता.

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 जून : शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) बरेच वेळा आपण बॉलच नाही तर बॅटनेही धमाका करू शकतो हे दाखवून दिलं आहे. टेस्टमध्ये शार्दुलच्या नावावर तीन अर्धशतकं आहेत. ही तीनही अर्धशतकं त्याने टीम इंडिया कठीण परिस्थितीमध्ये असताना केली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धचं (India vs Australia) त्याचं पहिलं अर्धशतक कोणताच भारतीय क्रिकेट चाहता विसरू शकणार नाही. शार्दुलने मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ब्रिस्बेन टेस्टमध्ये त्याचं पहिलं अर्धशतक केलं होतं. तेव्हा शार्दुलने पहिल्या इनिंगमध्ये वॉशिंग्टन सुंदरसोबत महत्त्वाची पार्टनरशीप केली, शेवटी हीच पार्टनरशीप टीम इंडियाच्या विजयाचं कारण ठरली. यानंतर इंग्लंड दौऱ्यात ओव्हल टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्येही शार्दुलने अर्धशतकं केली आणि भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ब्रिस्बेनमध्ये शार्दुलच्या खेळीमुळे टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय झाला असला तरी, त्यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) शार्दुलवर चांगलाच भडकला होता. अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) बंदों मे था दम या डॉक्युमेंट्रीमध्ये या मागची कहाणी सांगितली आहे, त्यावेळी अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा कर्णधार होता. ही डॉक्युमेंट्री व्हूटवर पाहता येणार आहे. 'ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबा टेस्टमध्ये आम्हाला 328 रनचं आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करताना आम्ही मयंक अग्रवाल आणि वॉशिंग्टन सुंदरच्या विकेट लवकर गमावल्या. यानंतर ऋषभ पंतला साथ द्यायला शार्दुल मैदानात आला, तेव्हा भारताला विजयासाठी 10 रनची गरज होती. शार्दुल बॅटिंगला जात होता तेव्हा, तूला हिरो बनण्याची संधी आहे, असं रोहित त्याला म्हणाला. शार्दुलनेही मान हलवली आणि तो बॅटिंगला गेला,' असं रहाणेने सांगितलं. जेव्हा ही घटना घडली तेव्हा अश्विनही ड्रेसिंग रूममध्ये बाजूलाच होता. अश्विननेही त्यावेळी घडलेला प्रसंग सांगितला. 'शार्दुल बॅटिंगला चालला होता, तेव्हा रोहित त्याला म्हणाला, मॅच संपवून ये. मी शार्दुलला चांगला ओळखतो. मला वाटतं त्याला 2011 वर्ल्ड कपमध्ये धोनीने मारलेला सिक्स आणि रवी शास्त्री यांची कॉमेंट्री आठवत असेल. तो चित्रपट, ते पुस्तक या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात होता, त्यामुळे तो मोठा शॉट मारून मॅच संपवण्याच्या विचारात होता. पण बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला आणि तो कॅच आऊट झाला. शार्दुलने हे काय केलं, असं ड्रेसिंग रूममध्ये बसलेला प्रत्येक जण बोलत होता,' असं अश्विन म्हणाला. रोहित भडकला शार्दुलने अशाप्रकारे विकेट फेकल्यामुळे रोहित शर्मा चांगलाच भडकला होता. 'रोहित माझ्या बाजूला बसला होता. विजयाच्या जवळ पोहोचल्यानंतर शार्दुलने अशाप्रकारचा शॉट मारल्यामुळे रोहित संतापला होता. मॅच संपूदे, एकदा विजय होऊ दे, मग मी शार्दुलला बघून घेतो, असं रोहित बोलला. यानंतर मी रोहितला समजवलं, आता हे विसरून जा. मॅच संपली की आपण यावर बोलू. भारताला विजयासाठी फार रनची गरज नव्हती, हे चांगलं होतं,' अशी आठवण रहाणेने सांगितली. शार्दुल आऊट झाल्यानंतर पुढच्याच बॉलला पंतने (Rishabh Pant) फोर मारली आणि भारताने ऐतिहासिक विजय मिळवला, याचसोबत ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजही जिंकली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ajinkya rahane, India vs Australia, Rohit sharma, Shardul Thakur

    पुढील बातम्या