मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

अजिंक्य रहाणेला टीममधून कधी बाहेर करायचं? सेहवागने सांगितली 'वेळ'

अजिंक्य रहाणेला टीममधून कधी बाहेर करायचं? सेहवागने सांगितली 'वेळ'

भारताच्या टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सध्या संघर्ष करत आहे. परदेशी जमिनीवर रनचा डोंगर उभारणारी अजिंक्यची बॅट शांत झाली आहे, त्यामुळे त्याच्यावर टीम इंडियातून (Team India) बाहेर जायची टांगती तलवार आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 14 सप्टेंबर : भारताच्या टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सध्या संघर्ष करत आहे. परदेशी जमिनीवर रनचा डोंगर उभारणारी अजिंक्यची बॅट शांत झाली आहे, त्यामुळे त्याच्यावर टीम इंडियातून (Team India) बाहेर जायची टांगती तलवार आहे. इंग्लंड दौऱ्यामध्येही (India tour of England) रहाणे अपयशी ठरला. संपूर्ण दौऱ्यात तो फक्त एक अर्धशतक करू शकला. यानंतर त्याचे टीकाकार वारंवार त्याला टीममधून बाहेर करण्याची मागणी करत आहेत. टीम इंडियाचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याच्यामते मात्र रहाणेला आणखी एका संधीची गरज आहे.

सोनी स्पोर्ट्स चॅनलसोबत बोलताना सेहवाग म्हणाला, 'रहाणेला आणखी एक सीरिज खेळायला मिळाली पाहिजे. अनेक खेळाडू परदेशामध्ये फ्लॉप होतात आणि रहाणेसोबतही असंच झालं आहे, पण त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या भारतात होणाऱ्या टेस्ट सीरिजमध्ये संधी मिळाली पाहिजे. जर या सीरिजमध्येही रहाणे फ्लॉप झाला तर त्याला बाहेर करावं.'

'जर परदेश दौऱ्यात खराब कामगिरी झाली, तर घरच्या सीरिजमध्ये तुम्हाला खेळवलं गेलं पाहिजे, असं मला वाटतं. परदेश दौरा कधीतरी होतो आणि भारतात तुम्हाला प्रत्येक वर्षी टेस्ट सीरिज खेळता येते. भारतातही रहाणेची बॅट चालली नाही, तर त्याचा फॉर्म खराब आहे, हे मी मानू शकतो. यानंतर त्याला टीममधून बाहेर केलं जावं,' असं वक्तव्य सेहवागने केलं.

रहाणेचा फ्लॉप शो, हे तीन खेळाडू पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी तयार!

'मी खूप महान खेळाडूंना बघितलं आहे, ज्यांनी 8-9 टेस्टमध्ये काहीच केलं नाही. त्यांच्या बॅटमधून एकही अर्धशतक आलं नाही, पण जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी एका वर्षात 1200-1500 टेस्ट रन केले,' अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली.

अजिंक्य रहाणे मागच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारताचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या मोसमात 1,159 रन केले. मेलबर्न टेस्टमध्ये शतक केल्यानंतर रहाणेला मोठा स्कोअर करता आला नाही, त्याची बॅटिंग सरासरी 19.86 एवढी कमी राहिली. इंग्लंडविरुद्धच्या 7 इनिंगमध्ये 15 पेक्षा जास्तच्या सरासरीने फक्त 109 रन करता आल्या.

First published:

Tags: Ajinkya rahane, India vs england, Virender sehwag