Home /News /sport /

रहाणेचा फ्लॉप शो, हे तीन खेळाडू पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी तयार!

रहाणेचा फ्लॉप शो, हे तीन खेळाडू पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी तयार!

भारताच्या टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला इंग्लंड दौऱ्यात (India tour of England) संघर्ष करावा लागला. इंग्लंडविरुद्धच्या 7 इनिंगमध्ये 15 पेक्षा जास्तच्या सरासरीने फक्त 109 रन करता आल्या.

    मुंबई, 13 सप्टेंबर : भारताच्या टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला इंग्लंड दौऱ्यात (India tour of England) संघर्ष करावा लागला. इंग्लंडविरुद्धच्या 7 इनिंगमध्ये 15 पेक्षा जास्तच्या सरासरीने फक्त 109 रन करता आल्या. गेल्या काही काळापासून सातत्याने मोठा स्कोअर करण्यातही रहाणेला अपयश येत आहे. रहाणेला वारंवार येणाऱ्या अपयशामुळे त्याला टीममधून बाहेर करावं, अशी मागणी अनेक चाहत्यांनी केली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयन चॅपल (Ian Chappell) यांनीही रहाणेला टीमबाहेर करण्याची भूमिका मांडली आहे, याशिवाय त्यांनी रहाणेच्या पर्यायी खेळाडूंची नावंही सांगितली आहेत, जे पाचव्या क्रमांकावर खेळू शकतात. ऋषभ पंत (Rishabh Pant), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हे खेळाडू तयार असल्याचं चॅपल यांना वाटतं. हे तिन्ही खेळाडू बॅटिंगसोबतच बॉलिंगही करतात, त्यामुळे टीमचं संतुलन योग्य होतं, अशी प्रतिक्रिया चॅपल यांनी दिली. 'मधल्या फळीत जडेजा, पंत, पांड्या आणि अश्विन (R Ashwin) असले तर तुम्हाला गरजेच्या असलेल्या रन ते देऊ शकतात. यानंतर पुढे तीन फास्ट बॉलर आहेत, यामुळे टीम मजबूत आणि संतुलित होते. असं बॉलिंग आक्रमण असल्यामुळे तुम्हाला फार रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्याची गरजही पडणार नाही,' असं चॅपल यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोसाठी लिहिलेल्या स्तंभामध्ये म्हणलं. 'टेस्ट मॅच जिंकण्यासाठी बॅट्समननी जलद रन कराव्या आणि बॉलरना 20 विकेट घेण्यासाठी वेळ द्यावा. तसंच या तिघांमध्ये तुम्हाला हवा तसा बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करता येईल. या सगळ्यांमध्ये पंतची बॅटिंग चांगली आहे, त्यामुळे पाचव्या क्रमांकावर तो पहिली पसंत असला पाहिजे,' असं चॅपल यांनी सांगितलं. अजिंक्य रहाणे सध्या टीम इंडियाचा उपकर्णधार आहे, पण रहाणेला टीमबाहेर जावं लागलं तर रोहित शर्मा उपकर्णधार बनण्यासाठी तयार आहे, असंही चॅपल यांनी आपल्या स्तंभात लिहिलं. स्पिनर्स बॉलिंग करत असताना रहाणेची स्लिपमधली अनुपस्थिती भारतीय टीमला जाणवेल, असं मतही चॅपल यांनी मांडलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ajinkya rahane, India vs england

    पुढील बातम्या