मुंबई, 14 डिसेंबर: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे(Ajinkya Rahane) आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत(Rishabh Pant) या दोघांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मित्र माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने (Vinod Kambli)कानमंत्र दिला आहे. सध्या सरावदरम्यानचे तिघांचे फोटो व्हायरल होत आहेत. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ बुधवारी, 16 डिसेंबर रोजी चार्टर फ्लाइटने दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहेत. तत्पूर्वी, मुंबईत तीन दिवसी संघाला क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, कांबळीने रहाणे आणि पंतसोबतचे काही फोटो शेअर केले. यावेळी त्याचा मुलगा क्रिस्टियानोदेखील उपस्थित होता. हे फोटो शेअर करताना कांबळीने कॅप्शनदेखील दिली आहे.
Was a pleasure to help Ajinkya & Rishabh train for the upcoming South Africa series. Shared some valuable insights with them about the SA conditions. My best wishes to them for #SAvIND series.
— Vinod Kambli (@vinodkambli349) December 13, 2021
P.S. Christiano got some lessons as well 😄 pic.twitter.com/bi0aRuyJHj
‘आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी अजिंक्य आणि ऋषभ यांना ट्रेनिंगमध्ये मदत केल्यामुळे आनंद झाला. यावेळी त्यांना काही मौलिक सल्ले दिले आहेत. माझ्याकडून दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी दोघांना शुभेच्छा!’ असे कांबळीने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून अंजिक्य रहाणे खराब फार्ममधून जात आहे. रहाणेने यापूर्वीच उपकर्णधारपद गमावले आहे. मात्र, रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. विराट कोहलीचा उपकर्णधार कोण असेल हे बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडिया 3 टेस्ट आणि 3 वनडे खेळणार आहे. 26 डिसेंबरपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. वनडे टीमची अजून घोषणा करण्यात आलेली नाही.
सचिन कांबळी खास मित्र
सचिन तेंडुलकर आणि विनोज कांबळी हे भारतीय क्रिकेटमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात एकत्रच केली होती. सुरुवातीला रमाकांत आचरेकर यांच्याकडे प्रशिक्षण घेतल्यानंतर ते शारदाश्रम शाळेकडून खेळले होते. पुढे मुंबई आणि भारतीय संघामध्येही ते एकत्र खेळले.