मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

अश्विनने किवींच्या Ajaz चा 'तो' प्रॉब्लेम चुटकीत सोडवला,10 वर्ष रखडले होते काम

अश्विनने किवींच्या Ajaz चा 'तो' प्रॉब्लेम चुटकीत सोडवला,10 वर्ष रखडले होते काम

Ravichandran Ashwin & Ajaz Patel

Ravichandran Ashwin & Ajaz Patel

किवींची स्पिनर एजाझ पटेलचे(Ajaz Patel) तब्बल 10 वर्ष रखडलेले काम भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने चुटकीत पूर्ण केले आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 7 डिसेंबर: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने किवींची स्पिनर एजाझ पटेलचे(Ajaz Patel) तब्बल 10 वर्ष रखडलेले काम चुटकीत पूर्ण केले आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भीमप्रराक्रम करणाऱ्या या अश्विनने वानखेडे मैदान गाजवलेला किवींचा स्पिनर एजाझ पटेलसाठी (Ajaz Patel)ट्विटरडे खास शिफारस केली होती. आणि त्याच्या शिफारसीची ट्विटरने काही तासांतच दखल घेतली.

एजाझ 2011 ला आपले ट्विटर अकाउंट सुरु केले होते. मात्र, त्याच अधिक दखल न घेतल्यामुळे त्याचे अकाउंट अद्याप व्हेरिफाय नव्हते. ते व्हेरिफाय होण्यासाठी अश्विनने पुढाकार घेतला. ट्विटला टॅग करत 10 विकेट घेणार्‍या खेळाडूचे अकाउंट व्हेरिफाय केले पाहिजे. अशी मागणी केले.

आर अश्विनने हे ट्वीट केल्यानंतर ट्विटरने या गोष्टीची लगेचच दखल घेतली. तसेच एजाज पटेलचे अकाऊंट अवघ्या काही तासातच व्हेरिफाय देखील केले. त्यानंतर आर अश्विनने ट्वीट करत ट्विटरचे आभार मानले. विशेष म्हणजे 2011 साली एजाजने ट्वीटरवर त्याचे अकाऊंट सुरू केले होते. त्यानंतर तब्बल 10 वर्षांनी त्याचे अकाऊंट व्हेरिफाय झाले आहे.

एजाझ पटेलचे ट्विटर अकाउंट पाहिले असता, 11 हजार पेक्षा अधिक फॉलोअर्स नसल्याचे लक्षात आले. त्याने 2011 मध्ये ट्विटर अकाऊंट ओपन केले असून केवळ 11 हजार 910 इतकेच फॉलोअर्स आहेत.

न्यूझीलंडकडून खेळत असलेल्या एजाझ पटेलचा जन्म मुंबईतच झाला आहे. जन्मानंतर घरच्यांसोबत तो न्यूझीलंडला गेला. तिथेच लहानाचा मोठा झाला आणि न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळत त्याने टीम इंडिया विरुद्ध टेस्ट क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

First published:

Tags: New zealand, R ashwin, Test series