Home /News /sport /

Ranji Trophy : 'सरांचा रेकॉर्ड मोडला असता तर...', मॅरेथॉन खेळीनंतर मुंबईच्या सुवेदची पहिली प्रतिक्रिया

Ranji Trophy : 'सरांचा रेकॉर्ड मोडला असता तर...', मॅरेथॉन खेळीनंतर मुंबईच्या सुवेदची पहिली प्रतिक्रिया

Pic : BCCI Domestic Cricket

Pic : BCCI Domestic Cricket

रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये (Ranji Trophy Quarter Final) उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या (Mumbai vs Uttarakhand) सुवेद पारकरने (Suved Parkar) 10 तास बॅटिंग करून 252 रनची मॅरेथॉन खेळी केली. मुख्य म्हणजे 21 वर्षांच्या सुवेद पारकरचा हा पदार्पणाचाच सामना होता.

पुढे वाचा ...
    मुंबई, 8 जून : रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये (Ranji Trophy Quarter Final) उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या (Mumbai vs Uttarakhand) सुवेद पारकरने (Suved Parkar) 10 तास बॅटिंग करून 252 रनची मॅरेथॉन खेळी केली. मुख्य म्हणजे 21 वर्षांच्या सुवेद पारकरचा हा पदार्पणाचाच सामना होता. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पहिल्याच सामन्यात द्विशतक करणारा सुवेद हा 12 वा तर 250 रन करणारा पाचवा खेळाडू ठरला. दिवसाची सुरूवात 104 रनवर करणाऱ्या सुवेदला मुंबईचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार (Amol Muzumdar) यांचा 260 रनचा विक्रम मोडण्याची संधी होती. 1993-94 च्या रणजी ट्रॉफी मोसमात अमोल मुजुमदार यांनी त्यांच्या पदार्पणाच्या सामन्यात 260 रन केले होते, पण सुवेद त्याच्या प्रशिक्षकाच्या विक्रमापासून फक्त 9 रन लांब राहिला. सुवेदने या खडूस खेळीनंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 'काल संध्याकाळीच आदित्य तरेने अमोल सरांच्या 260 रनच्या विक्रमाबाबत सांगितलं होतं. सरांचा विक्रम मोडता आला नाही, याचं वाईट वाटतंय, माझं लक्ष्य ते होतं,' असं पारकर मंगळवारी म्हणाला. या खेळीमध्ये सरफराज खाननेही आपल्याला मदत केल्याची प्रतिक्रिया पारकरने दिली. 'सरफराज सतत माझ्याशी बोलत होता आणि स्ट्राईक रोटेट कशी करायची ते सांगत होता. मी दबावात येणार नाही, याची काळजी सरफराजने घेतली,' असं सुवेद पारकरने सांगितलं. मुंबईचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी मात्र सुवेदने आपला विक्रम मोडायला हवा होता, अशी भावना व्यक्त केली. 'सुवेदची इनिंग उत्कृष्ट होती. त्याने 261 रन केल्या असत्या तर एक वर्तूळ पूर्ण झालं असतं. तो आऊट झाल्यानंतर मी त्याच्याशी फार बोललो नाही. अशाप्रकारची खेळी करून आल्यावर बॅट्समनच्या मनात काय असतं, याचा अनुभव मला आहे, त्यामुळे मी नंतर त्याच्याशी बोलेन,' असं मुजुमदार म्हणाले. 'तो विक्रमाच्या जवळ होता, पण यामुळे त्याच्या या खेळीचं कौतुक कमी होणार नाही. त्याचा कडक डिफेन्स आणि बॉडी लॅन्ग्वेज उत्तम होती. माझ्या तीन दशकांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मी अशाप्रकारची इनिंग बघितली नाही. शॉट मारताना तो गॅप शोधत होता, तसंच तो कधीही थकलेला जाणवला नाही,' असं वक्तव्य अमोल मुजुमदार यांनी केलं. दिनेश लाड यांचा शिष्य टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) घडवणाऱ्या दिनेश लाड यांचा सुवेदही शिष्य आहे. तो देखील रोहित प्रमाणे बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे. तो 2019-20 मध्ये टीम इंडियाच्या अंडर 19 टीमचा सदस्य होता. मागच्या महिन्यात मुंबईला सीके नायडू करंडक जिंकून देण्यात त्याचे मोलाचे योगदान होते.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या