मुंबई, 20 ऑगस्ट : तालिबानी दहशतवाद्यांनी (Taliban) अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर तेथील नागरिकांनी मिळेल त्या मार्गानं देश सोडण्यास सुरुवात केली आहे. या दहशतवाद्यांपासून जीव वाचवण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्या विमानाला लटकलेल्या अफगाण नागरिकांचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. या विमानातून पडल्यानं काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे. या मृत व्यक्तींमध्ये अफगाणिस्तानच्या फुटबॉलपटूचाही समावेश असल्याचं उघड झालं आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय टीमचा फुटबॉलपटू झाकी अनवारी (Zaki Anwari) याचा अमेरिकेतील विमानातून पडल्यानं मृत्यू झाला आहे. काबूल विमानतळावर 16 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या लोकांमध्ये अनवारीचाही समावेश होता. तालिबानच्या तावडीतून सुटण्यासाठी तो कसाबसा अमेरिकेच्या कार्गो विमानात तो चढला होता. मात्र विमानातून पडल्यानं त्याचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानच्या फुटबॉल टीमनं फेसबुरवरुन त्याच्या मृत्यूची माहिती दिली आहे. त्यांनी अनवारीचा फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर सरकारी पातळीवरुनही त्याच्या मृत्यूला दुजोरा देण्यात आला आहे. जाकी अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय युवा फुटबॉल टीमचा सदस्य होता. मोठी बातमी: अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डात घुसले तालिबान, राशिद खानचा सहकारीही सोबत अमेरिकेच्या एअरफोर्सनं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सी-17 हे विमान काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतले त्यावेळी त्याला अफगाण नागरिकांनी घेरले. विमानतळावरील सुरक्षा परिस्थितीचा विचार करुन पायलटनं लवकर विमानाचे उड्डाण करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये विमानातील काही जणांचा खाली पडून मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.