काबूल, 20 ऑगस्ट : अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता तालिबाननं (Taliban) तेथील क्रिकेट बोर्डावरही ताबा मिळवला आहे. तालिबानचे दहशतवादी गुरुवारी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (ACB) कार्यालयात घुसले. सोशल मीडियावर याचा एक फोटो व्हायरल (Photo Viral) झाला आहे. यामध्ये तालिबानी दहशतवादी एके-47 रायफल घेऊन क्रिकेट बोर्डाच्या कार्यालयात घुसले आहेत. तालिबानच्या दहशतवाद्यांसोबत अफगाणिस्तानचा माजी स्पिनर अब्दुल्लाह मजारी (Abdullah Mazari) देखील आहे. अब्दुल्लाह डावखुरा स्पिनर असून त्यानं अफगाणिस्तानकडून 2 आंतरराष्ट्रीय वन-डे सामने देखील खेळले आहे. त्याचबरोबर त्यानं 21 फर्स्ट क्लास, 16 लिस्ट A आणि 13 टी20 सामने खेळले आहेत. मजारी काबूल इगल्स या टीमचा खेळाडू होता. या टीमकडून तो राशिद खान (Rashid) सोबत देखील खेळला आहे. अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर तेथील क्रिकेटचे भविष्य धोक्यात आले आहे. या टीमनं मोठ्या कष्टानं टेस्ट क्रिकेटचा दर्जा मिळवला होता. राशिद खान, मोहम्मद नबी या क्रिकेटपटूंनी जगभरातील क्रिकेट स्पर्धा गाजवल्या आहेत. पण आता तालिबानच्या ताब्यात त्यांना पूर्वीसारखे क्रिकेट खेळता येईल का? याबाबत कुणालाही खात्री नाही.
तालिबानचा क्रिकेटला पाठिंबा? अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ हमिद शेनवारी यांनी केलेल्या दाव्यानुसार तालिबानपासून क्रिकेटपटूंना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही धोका नाही. तालिबानचा क्रिकेटला पाठिंबा असून त्यांची टीम टी20 वर्ल्ड कपमध्ये भाग घेणार आहे. त्याचबरोबर 10 ते 25 सप्टेंबरच्या दरम्यान शपागीजा क्रिकेट लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असल्याचा दावा क्रिकेट बोर्डानं केला आहे. ख्रिस क्रेन्सच्या तब्येतीबाबत महत्त्वाची अपडेट, ऑल राऊंडर देतोय मृत्यूशी झुंज महिला क्रिकेटला धोका तालिबान महिला स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांची सत्ता येताच देशातील महिला क्रिकेट धोक्यात आलं आहे. मागच्या वर्षी पहिल्यांदाच अफगाणिस्ताननं 25 महिला क्रिकेटपटूंशी करार केला होते. आता महिला टीम तालिबानमुळे बंद झाली तर त्यांचे आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व संपुष्टात येईल. कारण आयसीसीच्या नियमानुसार पूर्ण सदस्य असलेल्या देशांच्या दोन्ही टीम असणे आवश्यक आहे.

)







