मुंबई, 17 मार्च : अभिनेते आणि क्रिकेटपटूंच्या आयुष्यातील खासगी गोष्टी जाणून घेत त्या साजऱ्या करण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. सध्या क्रिकेटचाहत्यांमध्ये अशाच एका गोड बातमीची चर्चा आहे. (Jasprit Bumrah Sanjana Ganeshan wedding)
ती बातमी म्हणजे टीम इंडियामधले ताकदीचे गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं टीव्ही प्रेझेंटर संजना गणेशन हिच्यासह बांधलेली लग्नगाठ. संजना आणि बुमराह एका खासगी सोहळ्यात आपले नातेवाईक आणि मित्र यांच्या उपस्थितीत विवाहबद्ध झाले. (Anupama Parmeswaran sad song video)
यांनतर बुमराहनं आपल्या सोशल मीडिया अकांउंटवर सुरेख शब्दात पोस्ट लिहित सोहळ्यातील दोन फोटो शेअर केले आहेत. यात तो आणि संजना एकत्र दिसत आहेत. यानंतर अनेक लोक तिचं अभिनंदन करत आहेत.
हेही वाचा जसप्रीत बुमराह अडकला लग्नबेडीत, संजनाबरोबरच्या पारंपरिक विवाहाचे फोटो आले समोर
सोशल मीडियावर एकीकडे हे फोटो व्हायरल होत असताना दुसरीकडे अनुपमा परमेश्वरन हिनं गायलेलं एक गाणंही खूप व्हायरल होत आहे. (anupama parmeswaran premam actress)
तुम्हाला सांगायचं झालं तर, जसप्रीत बुमराहच्या लग्नाच्या चर्चा आधी 'प्रेमम'ची अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्यासोबत होती. मात्र, त्या चर्चेवर आता विराम लागला आहे. बुमराहनं आता संजनासोबत नवं जीवन सुरू केलं आहे. यादरम्यानच अनुपमानं आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती एक सॅड सॉंग गुणगुणताना दिसते. अनुमपा आता या गाण्याला मल्याळम भाषेत गाते आहे. याचे बोल chalanam chalanam असे आहेत. (anupama south actress song video)
View this post on Instagram
अनुपमा व्हिडिओमध्ये ही गाणी आपल्या सुरेल आवाजात गाते आहे. आपल्या भावना ती चाहत्यांसोबत शेअर करते आहे. हा 1982 साली आलेला vazhve mayam हा मल्याळम सिनेमा आहे. या गाण्यामध्ये अनुपमा कमालीचे जेस्चर्स देते आहे. शेवटी ती आपल्या चाहत्यांना गोड स्माईल देते आहे. (jasprit bumrah wedding)
हेही वाचा ‘मी केवळ दारु पितो अन् पार्ट्या करतो’; बॉलिवूडनं गोविंदाला केलं बेरोजगार
अनुपमा ज्या chalanam च्या लिरिक्सला आपल्या सुरात ओवते आहे त्याच्या अर्थ असा होतो, की नीट लक्ष देऊन आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका... तुम्हाला योग्य मार्ग नक्कीच मिळेल... मनातली खरी गोष्ट जाणा... हरेक जन्म आपलं भाग्य घेऊन येतो... याटाऊन निभावून जात पुढे जाण्यास काही स्वप्न मदत करतील. धाडसी बना... आयुष्य अतिशय ग्रेट गोष्ट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actress, Instagram, Jasprit bumrah, Marriage, Viral video., Wedding