‘मी केवळ दारु पितो अन् पार्ट्या करतो’; बॉलिवूडनं गोविंदाला केलं बेरोजगार

‘मी केवळ दारु पितो अन् पार्ट्या करतो’; बॉलिवूडनं गोविंदाला केलं बेरोजगार

गेल्या काही काळात तो सिनेसृष्टीपासून दूर आहे. (Govinda become jobless) कुठलाच निर्माता त्याला चित्रपट देण्यास तयार नाही. किंबहूना त्याचे चित्रपट प्रदर्शित देखील होऊ दिले जात नाहीत.

  • Share this:

मुंबई 15 मार्च: गोविंदा (Govinda) हा 90च्या दशकात बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जायचा. जबरदस्त डान्स, कॉमिक टाईमिंग, आणि अनोख्या अभिनय शैलीच्या जोरावर त्यानं जवळपास एक दशक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. परंतु गेल्या काही काळात तो सिनेसृष्टीपासून दूर आहे. (Govinda become jobless) कुठलाच निर्माता त्याला चित्रपट देण्यास तयार नाही. किंबहूना त्याचे चित्रपट प्रदर्शित देखील होऊ दिले जात नाहीत. असे अखबळजनक आरोप त्यानं बॉलिवूडवर केले आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत गोविंदानं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यानं करिअरच्या उतरत्या काळातील अनुभव सांगितला. तो म्हणाला, एक काळ होता जेव्हा मी अध्यात्मिक होतो. वाईट सवयींपासून दूर राहायचो. पण आता माझ्या स्वभावात बराच बदल झाला आहे. मी आता दारु पितो, पार्ट्या करतो, भ्रष्ट विचार करतो. माझी विचार करण्याची पद्धत आता बदलली आहे. आता मी केवळ व्यवसायिक अनुशंगानं विचार करतो. या इंडस्ट्रीनंच मला तसं बनवलं आहे.

अवश्य पाहा - ‘…जेव्हा मी काडीपैलवान होते’; पाहा प्राजक्ता माळीच्या बालपणीचा VIDEO 

मी आजवर कधीही कोणावरही टीका केलेली नाही. तरी देखील लोक माझा द्वेश करतात. गेल्या काही काळात मी 14 ते 15 कोटी रुपयांचं नुकसान सहन केलं आहे. कारण माझ्या चित्रपटांना थिएटर मिळत नाही. कदाचित मुद्दामुन माझ्यासोबत असा व्यवहार केला जात आहे. परंतु हे अधिक वेळ चालणार नाही. आता मी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. माझ्याकडे काही चांगले चित्रपट आहेत. मला आता कोणीही रोखू शकणार नाही. असा अनुभव गोविंदानं या मुलाखतीत सांगितला.

Published by: Mandar Gurav
First published: March 15, 2021, 4:59 PM IST

ताज्या बातम्या