जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सावध राहा! सोशल होणं येऊ शकतं अंगाशी; येतोय ‘इमेल फिमेल’

सावध राहा! सोशल होणं येऊ शकतं अंगाशी; येतोय ‘इमेल फिमेल’

सावध राहा! सोशल होणं येऊ शकतं अंगाशी; येतोय ‘इमेल फिमेल’

अभिनेता निखिल रत्नपारखी आणि कांचन पगारे ही जाहिरात क्षेत्रातील ही दोन परिचित नावं आता ‘इमेल फिमेल’ चित्रपटात आपली कमाल दाखवत धमाल उडवणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 फेब्रुवारी : सध्या जाहिरातींमधूनही कधी नव्हे इतके मराठी चेहरे आता दिसू लागले आहेत. अशाच वेगवेगळ्या जाहिरातींमधून घराघरांत पोहोचलेले दोन मराठी चेहेरे आता ‘इमेल फिमेल’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. अभिनेता निखिल रत्नपारखी आणि कांचन पगारे ही जाहिरात क्षेत्रातील ही दोन परिचित नावं आता ‘इमेल फिमेल’ चित्रपटात आपली कमाल दाखवत धमाल उडवणार आहेत. या दोघांचा जाहिरातीतला ‘शॉर्ट अँड स्वीट’ असा अंदाज या चित्रपटातून ही दिसणार आहे. इमेल फिमेल हा आगामी चित्रपट येत्या २६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. ‘एस.एम.बालाजी प्रोडक्शन’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली आहे. तर दिग्दर्शनाची जबाबदारी योगेश जाधव यांनी स्विकारली आहे. शंतनू या चित्रपटात एका मध्यमवर्गीय व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. तर दुसरीकडे कांचन एका ऐयाश व्यक्तीच्या भूमिकेत झळकेल. ‘खाओ पिओ ऐश करो’ असं मानत पार्ट्या करणारा कांचन आणि शंतनू या जोडगोळीचा अतरंगीपणा, त्यातून निर्माण झालेला पेच याची मनोरंजक पण तितकीच विचार करायला प्रवृत्त करणारी कथा म्हणजे ‘इमेल फिमेल’ हा चित्रपट. आज ‘सोशल राहणं’ ही काळाची गरज असली तरी व्यक्त होण्याच्या या माध्यमाच्या योग्य वापराचं भान ठेवणं ही तितकंच महत्त्वाच आहे. हे भान सुटलं तर कठीण प्रसंग निर्माण होऊ शकतो हे सांगण्याचा प्रयत्न ‘इमेल फिमेल’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. अवश्य पाहा -  रेखाच्या BOLD सीनमुळं उडाली होती खळबळ; शेखर सुमन यांचा ‘उत्सव’ पुन्हा चर्चेत निखिल रत्नपारखी, कांचन पगारे यांच्यासोबत विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन यांच्या ‘इमेल फिमेल’ चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा भक्ती जाधव यांची आहे. संवाद भक्ती आणि योगेश जाधव यांनी लिहिले आहेत. येत्या २६ फेब्रुवारीला ‘इमेल फिमेल’ प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात