नवी दिल्ली, 5 डिसेंबर : क्रिकेट मॅचेसचे टेस्ट, वनडे आणि टी-20 हे प्रकार आपल्याला माहिती आहेत. परंतु, याव्यतिरिक्त टी-10 क्रिकेट लीगदेखील खेळली जाते. ही लीग अबूधाबी टी-10 लीग म्हणून ओळखली जाते. या लीगला अमिराती क्रिकेट बोर्डाने मान्यता दिली आहे. तसंच आयसीसीचीदेखील या लीगला अधिकृत मान्यता आहे. या लीगमधल्या मॅचेस 10 ओव्हर्सच्या असतात आणि एक मॅच सुमारे 90 मिनिटं खेळली जाते.
नुकतीच अबूधाबी टी-10 लीग पार पडली. या लीगमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्स ही टीम विजेती ठरली. लीगच्या फायनलमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्सने न्यूयॉर्क स्ट्रायकर्सचा 37 रन्सनी पराभव करून चषकावर आपलं नाव कोरलं. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्सचा कॅप्टन निकोलस पूरनने जबरदस्त कामगिरी केली. निकोलसने या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक 345 रन्स केले. याशिवाय अन्य काही क्रिकेटर्सनीही दमदार कामगिरी केली. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
अबूधाबी टी-10 लीगमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्सचा कॅप्टन निकोलस पूरन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. टी-10 च्या फायनल मॅचमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्सने न्यूयॉर्क स्ट्रायकर्सचा 37 रन्सनी पराभव करून चषकावर आपलं नाव कोरलं. या मॅचमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्सने प्रथम बॅटिंग करून 128 रन्स केले. न्यूयॉर्क स्ट्रायकर्सने या रन्सचा पाठलाग करताना 10 ओव्हर्समध्ये 91 रन्स केले. डेक्कन ग्लॅडिएटर्सला चॅम्पियन बनवण्यात कॅप्टन निकोलस पूरनचं मोठं योगदान होतं. फायनल मॅचमध्ये निकोलसने 23 बॉल्समध्ये 40 रन्स केले. डेक्कन ग्लॅडिएटर्स टीमच्या या कॅप्टनने संपूर्ण लीगमध्ये सर्वाधिक 345 रन्स काढले.
हेही वाचा - ENG Vs PAK: इंग्लंडने पहिली कसोटी जिंकली, पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव
बॉलिंगचा विचार करता, अबूधाबी टी-10 मध्ये ड्वेन प्रिटोरियसने 10 मॅचेसमध्ये 12 विकेट्स घेतल्या. जॉर्डन थॉम्पसनने 12 विकेट्स घेतल्या; पण त्याचा इकॉनॉमी रेट 12.55 प्रति ओव्हर होता. प्रिटोरियसचा इकॉनॉमी रेट केवळ 9.81 होता. टी-10 लीग स्तरावर हा इकॉनॉमी रेट उत्तम आहे. या लीगमध्ये निकोलस पूरनने 345, तर कॅडमोरने 289 रन्स केले. कॅडमोरने 20 सिक्सर्स मारले.
टीम डेव्हिडने 16 सिक्सर्सच्या जोरावर 221 रन्स केले. निकोलस पूरनने टी-10 लीगमध्ये सर्वाधिक 25 सिक्सर्स मारले. याशिवाय सर्वाधिक तीन हाफ सेंच्युरीज अर्थात अर्धशतकं केली. निकोलस पूरनने पूर्ण लीगमध्ये 147 बॉल्समध्ये एकूण 345 रन्स केले. या क्रिकेटरची सरासरी 49.28 अशी राहिली. पूरनचा स्ट्राइक रेट सर्वाधिक म्हणजे 234पेक्षा जास्त राहिला. निकोलस पूरनची कामगिरी सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, World cricket