मुंबई, 18 ऑक्टोबर : 17 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीमध्ये स्पेन येथे ‘अंडर-23 वर्ल्ड चॅम्पियनशिप’ कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पेनमधील पोंटेविड्रा येथे या स्पर्धेतील सर्व लढती होणार आहेत. या दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाची (डब्ल्युएफआय) डोकेदुखी वाढली आहे. स्पेनमध्ये होणाऱ्या ‘अंडर-23 वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये सहभागी होणाऱ्या 21 भारतीय कुस्तीपटूंना व्हिसा नाकारण्यात आला आहे. स्पेनच्या दूतावासानं जे कारण देऊन व्हिसा रद्द केला आहे, ते वाचून तुम्हाला नक्कीच संताप येईल. स्पर्धा संपल्यानंतरही भारतीय कुस्तीपटू स्पेन सोडणार नाहीत, अशी शंका असल्याचं कारण देऊन व्हिसा नाकारण्यात आला आहे. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. डब्ल्युएफआयचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी पीटीआयला सांगितलं, “आम्ही याआधी कधीही अशा परिस्थितीचा सामना केला नव्हता. भारत सरकारचे मंजुरी पत्र आणि जागतिक कुस्तीची प्रशासकीय संस्था असलेल्या यूडब्ल्युडब्ल्युचं निमंत्रण पत्र दाखवूनही आमच्या कुस्तीपटूंना क्षुल्लक कारणांवरून व्हिसा नाकारण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला इतिहास, पण वॉर्नरला बसला धक्का! आम्ही जेव्हा लवकरात वकर पासपोर्ट परत देण्याची विनंती केली तेव्हा आम्हाला व्हिसा नामंजुरीचं पत्र मिळालं. ही खरोखरच विचित्र बाब आहे. भारतीय कुस्तीपटू आणि प्रशिक्षक स्पर्धा संपल्यानंतर भारतात परतणार नाहीत, या निष्कर्षावर स्पॅनिश अधिकारी कसे पोहोचले, हे खरोखरच समजण्यापलीकडचं आहे.” वर्ल्ड चॅम्पियन कुस्तीपटूचाही अपमान सोमवारपासून (17 ऑक्टोबर) सुरू झालेल्या ‘अंडर-23 वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये सहभागी होण्यासाठी डब्ल्युएफआयनं 30 सदस्यीय संघाची निवड केली होती. मात्र, 30 पैकी केवळ नऊ खेळाडूंना व्हिसा देण्यात आला आहे. या चॅम्पियनशिपमध्ये पदकाची प्रबळ दावेदार मानली जाणारी आणि 20 वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियन अंतिम पंघालचाही व्हिसा रद्द करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. युवराज ते आफ्रिदी… पाहा टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील वादाच्या घटना प्रशिक्षकांनाही नाकारला व्हिसा डब्ल्युएफआयने आपल्या नऊ प्रशिक्षकांच्या व्हिसासाठी अर्ज केला होता. त्यापैकी फक्त सहा जणांना व्हिसा मिळाला. 10 फ्रीस्टाइल कुस्तीपटूंपैकी फक्त अमनला (57 किलो) व्हिसा मिळाला तर इतर नऊ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले. विशेष म्हणजे एका खेळाडूसाठी तीन फ्रीस्टाइल प्रशिक्षकांना व्हिसा देण्यात आला आहे. सहा ग्रीको-रोमन कुस्तीपटू आणि महिलांपैकी फक्त अंकुश (50 किलो) व मानसी (59 किलो) यांना व्हिसा मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.