• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : काका की पुतण्या, पवार कुणाला देणार नाशिकमधून उमेदवारी?
  • SPECIAL REPORT : काका की पुतण्या, पवार कुणाला देणार नाशिकमधून उमेदवारी?

    News18 Lokmat | Published On: Mar 6, 2019 10:48 PM IST | Updated On: Mar 6, 2019 10:48 PM IST

    प्रशांत बाग, नाशिक, 06 मार्च : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जाहीर झाल्यानंतर, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचा नाशिक जिल्हा दौरा हा वादळी ठरला. शरद पवारांनी दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकदिलाने भाजपविरोधात लढण्याचं आवाहन केलं खरं पण, नाशिकचा उमेदवार कोण असणार हे काही सांगितलंच नाही. पण छगन भुजबळांच्या भाषणाचा संपूर्ण फोकस हा मात्र, फक्त समीरवरच होता. समीर जेलमध्ये माझ्यासोबत नसता तर मी जिवंत बाहेर आलोच नसतो,असं सांगून भुजबळांनी कार्यकर्त्यांना पुरतं भावनिक करून टाकलं. परंतु, नाशिक लोकसभा उमेदवार पवार जाहीर करतील ही अपेक्षा सगळ्यांना होती. मात्र, पवारनीती ही संकेत देणारी ठरली. दोन्ही कॉंग्रेस पुन्हा जोमानं कामाला लागण्यासाठी त्यांनी घेतलेली बैठक खरोखर फलदायी ठरणार का? ही चर्चा सुरू झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading