जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Black Thread In Leg : पायावर का बांधला जातो काळा धागा? काय आहे धार्मिक महत्त्व आणि बांधण्याचे नियम

Black Thread In Leg : पायावर का बांधला जातो काळा धागा? काय आहे धार्मिक महत्त्व आणि बांधण्याचे नियम

Black Thread In Leg : पायावर का बांधला जातो काळा धागा? काय आहे धार्मिक महत्त्व आणि बांधण्याचे नियम

अनेकजण पायाला काळा धागा बांधतात. ज्योतिषशास्त्रानुसार वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी पायात काळा धागा बांधला जातो. परंतु त्यामागे धार्मिक महत्त्व देखील आहे आणि तो बांधण्याचे काही नियम देखील आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 ऑगस्ट : काळा रंग वाईट नजरेपासून रक्षण करतो असे मानले जाते. त्यामुळे अनेक जण काळ्या रंगाचे कपडे घालतात, काळे टिका लावतात, तर काही जण मुलांना काजळ लावतात, पायाभोवती काळा धागा बांधल्याने कोणाची वाईट नजर लागत नाही असे मानले जाते. पायात बांधलेला काळा धागाही वाईट नजरेपासून वाचवतो. आजकाल काही लोक फॅशन आणि स्टाईलसाठी पायात काळा धाका बांधतात. यालाच दृष्ट लागणे असे देखील म्हटले जाते. आपण लहानपणापासून मोठ्यांकडून ऐकत आलो आहोत की पायाला काळा दोरा बांधल्याने वाईट नजरेचा परिणाम होत नाही. लहान मुलांपासून ते स्त्रिया आणि पुरुषांपर्यंत सर्वजण पायाला काळा धागा बांधू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार पायात काळा धागा बांधल्याने नकारात्मक शक्ती दूर राहतात. दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून जाणून घेऊया काय आहे पायांना काळा धागा बांधण्याचे धार्मिक महत्त्व. राहू-केतू आणि शनीच्या महादशापासून होतो बचाव कुंडलीतील कोणत्याही ग्रहांचा प्रभाव कमजोर असेल तर व्यक्तीच्या जीवनात समस्या सुरू होतात. ज्योतिषशास्त्रानुसार पायावर काळा धागा बांधल्याने शनीची महादशा, साडेसाती आणि धैय्याचा प्रभाव कमी होतो. यासोबतच कुंडलीत शनि ग्रहाला बळ मिळते. राहु-केतू कुंडलीत कमजोर असेल तर ज्योतिषी पायात काळा धागा बांधण्याची शिफारस करतात.

Vastu Tips : झाड लावताना तुम्हीही करता ही चूक? पाहा कोणते झाड अंगणात लावणे असते शुभ आणि अशुभ

वाईट नजरेपासून होते संरक्षण तुम्ही अनेकदा वाईट नजरेविषयी ऐकले असेल. विशेषत: लहान मुलांना अनेकदा दृष्ट लागते. यासोबतच घर, व्यवसाय आणि सुखावरही कुणाची वाईट नजर पडू शकते. ज्योतिष शास्त्रातही दृष्ट दूर करण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. काळा धागा हा दृष्ट काढण्याच्या अनेक मार्गांपैकी एक आहे. पायात काळा धागा घातल्याने तो दिसत नाही आणि व्यक्ती नकारात्मक शक्तींच्या प्रभावापासूनही दूर राहते. कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं पायावर काळा धागा बांधण्याचे नियम पायावर काळा धागा बांधण्याचे काही नियम आहेत. त्यानुसार पुरुषांनी उजव्या पायावर काळा धागा बांधावा. तर महिलांनी डाव्या पायावर काळा धागा बांधला पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात