मुंबई, 16 मे : हिंदू धर्मात शनिदेवाला न्यायदेवता मानलं जातं. शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो, चांगलं कर्म करणाऱ्यांना चांगलं आणि वाईट कर्म करणाऱ्यांना खराब परिणाम भोगावे लागतात. पण, शनिदेव हे असे देवता आहेत की, जर ते एखाद्यावर प्रसन्न झाले तर त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी-त्रास संपतात, परंतु शनिदेवांचा कोपही तितकाच भयंकर मानला जातो. अहमदनगरपासून 30 किलोमीटर अंतरावर नेवासे तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनिचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. येथे श्रीशनैश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती 5 फूट 9 इंच उंचीची आहे. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली. या स्तंभाला वेगळा आकार नाही. शनि – ज्योतिषशास्त्रात भयानक ग्रहांपैकी एक आहे. पौराणिक कथेनुसार श्रावण महिन्यात एके दिवशी मुसळधार पावसामुळं नदीच्या पाण्याची पातळी खूप वाढली होती, त्यावेळी शिंगणापूरच्या नदी काठावर एक मोठा काळा खडक आला होता. काही दिवसांनी गावातील काही मुलं तिथे खेळायला आली, मुलं माती आणि दगडांनी खेळू लागली आणि एका लहान मुलाने चुकून त्या काळ्या दगडावर एक मोठा दगड आपटला. दगड आदळताच त्या दगडातून जोरात किंचाळण्याचा आवाज आला आणि त्याचवेळी त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या, हे भयानक दृश्य पाहून सर्व मुले घाबरून घराकडे पळाली. तेथे गेल्यानंतर घाबरलेल्या मुलांनी हा सगळा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर संपूर्ण गाव त्या खडकाला पाहण्यासाठी नदीच्या काठावर जमा होऊ लागला. तो विचित्र खडक पाहून गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं आणि काहीजण त्या खडकाला भूत म्हणू लागले, काही वेळाने ते सर्वजण गावात परतले.
शनिदेवानेच वास्तव सांगितलं - त्या रात्री शनिदेव महाराजांनी गावाच्या प्रमुखाला स्वप्नात दर्शन दिलं आणि त्यांनी सांगितलं की, ते स्वतः खडकाच्या रूपात आपल्या गावात आले आहेत. हे ऐकून गावाच्या प्रमुखाला खूप आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने संपूर्ण स्वप्न गावकऱ्यांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर गावकऱ्यांनी फार विलंब न लावता बैलगाडी वगैरे घेऊन नदीकाठी दाखल झाले. तेथे लोकांनी शनिदेवाचा जयजयकार करत पूर्ण आदराने त्यांना बैलगाडीत बसवून गावात आणून प्रतिष्ठापना करण्यात आली. Shani Dev: म्हणून अनेकांवर शनिदेवाची पडते वक्रदृष्टी; अशा गोष्टी लागोपाठ घडत जातात दर्शनाचे नियम – शनी शिंगणापूर येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. देव दर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते. शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. स्त्रियांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास मनाई आहे. दर्शनापूर्वी आंघोळ करून शुचिर्भूत होणे आवश्यक असते. आंघोळीची व्यवस्था देवस्थानाच्या आवारात कायम आहे. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तिळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते. शनि जयंती - ज्या दिवशी भगवान शनि जन्मला होता किंवा पृथ्वीवर प्रकट झाला होता, याला शनिश्चरा जयंती म्हणून देखील ओळखले जाते आणि वैशाख महिन्यात अमावस्येच्या दिवशी शनी जयंती पाळली जाते. या दिवशी मूर्ती निळ्या रंगाची दिसते. ‘पंचमृत’ आणि ‘गंगाजल’ शनिश्चराच्या मूर्तीच्या स्वच्छतेसाठी वापरले जातात. सगळं ठीक असून पण सुख-शांती मिळत नाही? तुमच्या कुंडलीत ‘हा’ दोष असू शकेल शनिदेवाची पूजा का? कशी? कधी करावी?
- जर तुमच्या राशीत शनीचे आगमन झाले असेल तर ….
- जर तुम्ही साडेसातीने ग्रस्त असाल तर…..
- जर तुम्ही शनी दृष्टीने पीडित व त्रस्त असाल तर….
- जर तुम्ही कारखाना , लोखंडी उद्योग , ट्रव्ह्ल्स , ट्रक, तेल पेट्रोलियम, मेडिकल, प्रेस, कोर्ट-कचेरी क्षेत्राशी संबंधित असाल तर ……
- जर आपण एखादे शुभकार्य प्रारंभ करीत असाल तर ….
- जर आपल्या व्यवसायात, कारभारात घाटा, नुकसान होत असेल तर; जर तुम्ही रोग – कॅन्सर, एड्स, कुष्टरोग, किडनी, लकवा ग्रस्त, हृदयरोग, मधुमेह, त्वचा रोगाने त्रस्त व पीडित असाल तर श्री शनिदेवाची पूजा – अर्चा अभिषेक जरूर करावा.
- डोक्यावरील टोपी काढूनच दर्शन घ्यावे.
- ज्याच्या घरी बाळंतपण , सुतक , रजोदर्शन असलेल्यांनी शनी दर्शन करू नये.
सर्व कार्यात शनिची साथ मिळेल हमखास; यंदाच्या शनि जयंतीला करा हे महत्त्वाचे उपाय (सूचना : येथे दिलेली माहिती विविध स्त्रोतातून मिळवलेली आणि धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही, न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)