advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / सर्व कार्यात शनिची साथ मिळेल हमखास; यंदाच्या शनि जयंतीला करा हे महत्त्वाचे उपाय

सर्व कार्यात शनिची साथ मिळेल हमखास; यंदाच्या शनि जयंतीला करा हे महत्त्वाचे उपाय

Shani Jayanti 2023 : हिंदू धर्मात शनिदेवाला न्याय देवता मानलं जातं. शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात, पण शनिदेव हे असे देवता आहेत की, जर ते एखाद्यावर प्रसन्न झाले तर त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी-त्रास संपतात, परंतु शनिदेवांचा कोपही तितकाच भयंकर मानला जातो.

01
यंदाची शनि जयंती 19 मे रोजी येत आहे. असे मानले जाते की, जो कोणी या दिवशी शनिदेवाची मनापासून पूजा करतो, न्यायाची देवता शनि त्याचे सर्व दुःख दूर करतो. शनि जयंतीच्या दिवशी काय करावे आणि काय टाळावे? याविषयी मध्यप्रदेशच्या भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु तज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी दिलेली माहिती पाहुया.

02
- शनिदेव पूजा शुभ मुहूर्त यावेळी शनि जयंती अमावस्येला येत आहे. वैशाख महिन्यातील अमावस्या तिथी 18 मे रोजी रात्री 9:44 ते दुसऱ्या दिवशी 19 मे रोजी रात्री 9:24 पर्यंत असेल. 19 मे रोजी सकाळी 7:11 ते 10:35 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. दुपारी 12:18 ते 2:00 पर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे. संध्याकाळी, शनिदेवाच्या पूजेचा शुभ मुहूर्त 5:25 ते 7:07 असेल. शुभ मुहूर्तावर शनिदेवाची पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो, असे मानले जाते.

03
शनि जयंतीला काय करावे आणि काय करू नये - - शनि जयंती अमावस्येला आली आहे. या दिवशी गरीब असहाय्य लोकांना मदत केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. हिंदू धर्मात अमावस्येच्या दिवशी दान करणे शुभ आणि फलदायी मानले जाते. म्हणूनच शनि जयंतीच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार काळे कपडे, जोडे, धान्य, काळे उडीद इत्यादी दान करा आणि गरिबांना खाऊ घाला.

04
- शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाला मोहरीचं तेल अर्पण करा, शनीच्या मंत्रांचा जप करा. असे केल्याने माणसाच्या आयुष्यात येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात.

05
- जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष असेल तर शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा करताना काळे तीळ, काळे उडीद, काळी मिरी, शेंगदाणा तेल, लवंग, तमालपत्र, काळे मीठ यांचा पूजेच्या साहित्यात समावेश करावा. असे केल्याने शनिदेवाचा कोप कमी होतो.

06
- शनि जयंतीच्या दिवशी गरीब, असहाय्य, कष्टकरी, मजूर किंवा महिलांचा अपमान टाळा. कुत्र्यांचा छळ करू नका, या दिवशी खोटे बोलणे हे पाप आहे. कोणाचीही फसवणूक करू नका, असं केल्यानं शनिदेवाचा कोप होतो.  (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :
  • यंदाची शनि जयंती 19 मे रोजी येत आहे. असे मानले जाते की, जो कोणी या दिवशी शनिदेवाची मनापासून पूजा करतो, न्यायाची देवता शनि त्याचे सर्व दुःख दूर करतो. शनि जयंतीच्या दिवशी काय करावे आणि काय टाळावे? याविषयी मध्यप्रदेशच्या भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु तज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी दिलेली माहिती पाहुया.

    MORE
    GALLERIES