जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / सगळं ठीक असून पण सुख-शांती मिळत नाही? तुमच्या कुंडलीत 'हा' दोष असू शकेल

सगळं ठीक असून पण सुख-शांती मिळत नाही? तुमच्या कुंडलीत 'हा' दोष असू शकेल

कुंडलीतील दोषांवर उपाय

कुंडलीतील दोषांवर उपाय

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये अशुभ ग्रह स्थितीचा एखाद्या शुभ ग्रहाशी संयोग होत असेल तर अशा स्थितीत कुंडलीत दोष निर्माण होतो. या दोषामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 मे : ज्योतिष शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थान यांची गणना करून त्याची जन्मकुंडली बनवली जाते. ज्याच्या आधारे एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती निश्चित केली जाते. याद्वारे कुंडलीतील दोषांचेही आकलन करता येते. ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असलेले गुण आणि दोष व्यक्तीच्या जीवनावर खूप प्रभाव पाडतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये अशुभ ग्रह स्थितीचा एखाद्या शुभ ग्रहाशी संयोग होत असेल तर अशा स्थितीत कुंडलीत दोष निर्माण होतो. या दोषामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. जन्मकुंडलीत या दोषांपैकी एक दोष म्हणजे केंद्राधिपती दोष. ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा केंद्राधिपती दोष म्हणजे काय? आणि केंद्राधिपती दोषाच्या उपायांबद्दल माहिती देत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील काही घरांमध्ये शनि, राहू आणि मंगळासारखे अशुभ ग्रह असतात. त्यामुळे ते एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीला हानी पोहोचवतात. ज्यामुळे कुंडलीत दोष निर्माण होतात. जन्मकुंडलीत शुभ ग्रहांमुळे निर्माण होणाऱ्या दोषाला केंद्राधिपती दोष म्हणतात.

News18लोकमत
News18लोकमत

केंद्राधिपति दोष म्हणजे काय? जेव्हा गुरु, शुक्र, बुध किंवा शुक्ल पक्षातील चंद्र हे केंद्र घराचे स्वामी बनतात तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत केंद्राधिपति दोष तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, केंद्र घरांचे स्वामी (1ले, 4वे, 7वे आणि 10वे घर) आणि त्रिकोण घरे (1ले, 5वे आणि 9वे घर) नेहमीच शुभ परिणाम देतात, परंतु या दोषामुळे केंद्र घरांचे स्वामी नकारात्मक परिणाम देतात. गुरू आणि शुक्र हे दोष निर्माण होण्याचे कारण आहेत, पण या दोषाच्या निर्मितीमध्ये बुध आणि चंद्राचाही हातभार असतो. या दोषामुळे आर्थिक स्थिती, करिअरमधील समस्या, आरोग्य, समाजातील मान-प्रतिष्ठेची हानी असे अनेक कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतात. घरात पितृदोष असल्यास वेळ नका घालवू; अशुभ घडण्यापूर्वी हे उपाय करून घ्या केंद्राधिपति दोष दूर करण्याचे काही सोपे उपाय - एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत केंद्राधिपती दोष असेल तर त्या व्यक्तीने भगवान शंकराची मनोभावे पूजा करावी. जर तुमच्या कुंडलीत केंद्राधिपती दोष असेल तर दररोज मंदिरात जाऊन शंकराचे दर्शन घ्यावे, पूजा करावी. मंदिरात दररोज 11 वेळा “ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप करावा. याशिवाय ‘ओम नमो नारायण’ या मंत्राचा 21 वेळा जप केल्यास या दोषाचा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. अशी स्वप्नं पडणं शुभ संकेत असतात! देवी लक्ष्मीच्या कृपेनं धनलाभ होण्याचे योग (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Religion , vastu
  • First Published :
जाहिरात
जाहिरात