जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Vastu: किचनमध्ये खलबत्ता/वरवंटा कुठं ठेवावा? दिशा आणि हे वास्तु नियम लक्षात ठेवा

Vastu: किचनमध्ये खलबत्ता/वरवंटा कुठं ठेवावा? दिशा आणि हे वास्तु नियम लक्षात ठेवा

खलबत्त्याचे वास्तू नियम

खलबत्त्याचे वास्तू नियम

khalbatta vastu tips: वास्तुशास्त्रामध्ये किचनशी संबंधित टिप्स सांगितल्या जातात, तसेच खलबत्त्याबाबतही अनेक प्रकारचे वास्तु नियम आहेत. खलबत्त्यासंबधी वास्तू टिप्स लक्षात ठेवल्या नाहीत तर कुटुंबाला अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागू शकते, असे मानले जाते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 08 जुलै : आजही अनेक घरांमध्ये खलबत्ता/वाटा-वरवंटा वापरला जातो. खलबत्त्यामध्ये चटणी आणि मसाले ठेचून बारीक केले जातात. काही लोकांच्याकड मिक्सरच्या जमान्यातही वाटा-वरवंटा वापरला जातो, त्यावर काही गोष्टी वाटल्या जातात. अनेकजण या वस्तू घरात कोणत्याही कोपऱ्यात ठेवून देतात, पण वास्तुशास्त्रानुसार असं करू नये. वास्तुशास्त्रामध्ये किचनशी संबंधित टिप्स सांगितल्या जातात, तसेच खलबत्त्याबाबतही अनेक प्रकारचे वास्तु नियम आहेत. खलबत्त्यासंबधी वास्तू टिप्स लक्षात ठेवल्या नाहीत तर कुटुंबाला अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागू शकते, असे मानले जाते. जाणून घ्या घरात खलबत्ता/ वाटा-वरवंटा ठेवण्याची स्थिती आणि दिशा संबंधित काही वास्तु टिप्स.

News18लोकमत
News18लोकमत

खलबत्यासंबंधित वास्तु टिप्स - खलबत्ता ठेवण्याच्या योग्य दिशेबाबत वास्तुशास्त्रात सांगितले आहे. खलबत्ता घरात ईशान्य दिशेला ठेवावा. खलबत्ता पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवू नये. वास्तूनुसार जर तुम्ही खलबत्ता चुकीच्या दिशेला ठेवलात तर तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. खलबत्ता वापरल्यानंतर नेहमी स्वच्छ धुवून ठेवायला हवा. खलबत्त्याचे दोन्ही भाग पाण्याने चांगले धुवावेत, फक्त ओल्या कपड्याने पुसून नये खलबत्ता धुताना तो साबणाने धुतला जाऊ नये, याची विशेष काळजी घेतली जाते. वास्तुशास्त्रानुसार तुटला-फुटलेला खलबत्ता घरात ठेवू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. चातुर्मासात या नियमांचे करावे पालन; भगवान विष्णूची कुंटुंबावर राहील सदैव कृपा वाटा-वरवंटा जमिनीवर न ठेवता भिंतीला चिकटवून उभा ठेवावा. यामुळे तो खराब होत नाही. वास्तूनुसार खलबत्त्याचे दोन्ही भाग नेहमी सोबत ठेवावेत. दोन्ही वेगळे ठेवण्याची चूक होता कामा नये. दगडाऐवजी लाकडी खलबत्ता वापरला जात असेल तर तो कडुलिंबाच्या लाकडाचा असावा. कडुनिंब घरात ठेवल्याने सकारात्मकता येते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असते. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात