अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा 22 जून : चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच या दिवशी उपवास केल्याने श्रीगणेश प्रसन्न होऊन भक्तांचे अडथळे दूर करतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. या दिवशी अनेक गणेशभक्त मनोभावे गणपतीची आराधना करून उपवास करतात. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी आवडते फूल आणि मनोभावे अथर्वशीर्ष पठण केले जाते. आज (22 जून) रोजी विनायक चतुर्थी आहे. त्यानिमित्तानं विनायक आणि संकष्टी चतुर्थीमध्ये काय फरक आहे? याची माहिती वर्ध्यातील गोपाळराव नारीकर महाराजांनी माहिती दिलीय. कसा करावा उपवास? एका भक्ताने दिलेल्या माहितीनुसार, संकष्टी चतुर्थीला उपवास ठेवणारे अनेक भक्त काही गोष्टी कटाक्षाने पाळतात.तर विनायक चतुर्थी ला मोजकेच लोक उपवास करतात.संकष्टी चतुर्थी ला केल्या जणाऱ्या उपवासाला 21 मोदक बनविले जातात,मोदक खाऊनच भक्ताला उपवास सोडायचा असतो. 21 पैकी त्यात 1 मोदक मिठाचा असतो.. आणि हे 21 मोदक उपवास ठेवणाऱ्या भक्ताला ग्रहण करावे लागतात..काही भक्त चतुर्थीच्या दिवशी मीठ खात नाही तर काही भक्त आपापल्या इच्छेप्रमाणे साधा उपवास करतात.
बाप्पाला प्रसन्न कसं करावं ? विनायक चतुर्थीपेक्षा संकष्टी चतुर्थीला जास्त महत्व असल्याचं महाराजांनी सांगितलं. कोणत्याही चतुर्थीला पूजा करत असताना गणपतीला लाल टिळा लावून जास्वंदाचे लाल रंगाचे फुल, दूर्वा आणि शमीपत्र अर्पण केले असता गणपती बाप्पा प्रसिद्ध होऊन भक्तांची मनोकामना पूर्ण करतो आणि भक्तांचे मार्ग देणारे अडथळे दूर करतो असं मानलं जातं. त्यामुळे मोठ्या संख्येने गणेशभक्त चतुर्थीचा उपवास करतात. विनायकीपेक्षा संकष्टी चतुर्थीला उपवास करण्याची संख्या जास्त आहे. विनायक चतुर्थीला या स्तोत्राचा करा जप; बाप्पा संकट दूर करेल, मिळेल सुख-समृद्धी नाव कसं पडलं? पौंष महिन्यात श्री गणेशाचा जन्म झाला. त्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं नाव पडलं. गोपाळराव नारीकर महाराज यांनी विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी यामधला फरक सांगून पौष महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीला विनायक चतुर्थी नाव कसे पडले ते सांगितले आहे.. तसेच पौष महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीला तिळाचे मोदक करण्याची परंपरा असल्याचं ते सांगतात. पौंष महिन्यात थंडी असते आणि यादरम्यान शरीराला उष्णतेची आवश्यकता असते, तिळातून शरीरात उष्णता निर्माण होते.या महिन्यात तीळ सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे पौष महिन्यातील विनायकी चतुर्थीला तिळाचे मोदक करण्यामागे हे शास्त्रीय कारण असू शकतं,’ असं महाराजांनी सांगितलं. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)