जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / काळे रत्न धारण केल्यानं नशीब बदलतं का? वाचा काय होतो परिणाम?

काळे रत्न धारण केल्यानं नशीब बदलतं का? वाचा काय होतो परिणाम?

काळ्या रत्नाचा काय होतो फायदा?

काळ्या रत्नाचा काय होतो फायदा?

काळा हकीक रत्न धारण करण्याचे फायदे आणि लाभ काय आहेत?

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 19 जुलै :  तुम्ही रोज वापरत असलेल्या रत्नाचेही अनेक प्रकार आहेत. त्यापासून वेगवेगळे फायदे देखील होतात. पण, कोणते रत्न धारण धारण करावीत आणि त्याची निवड कशी करावी हे अनेकांना माहिती नसते. 84 रत्नांपैकी 9 मुख्य रत्ने मानली जातात. यामध्ये मोती, पन्ना, प्रवाळ, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, वैदुर्य यांचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला ब्लॅक हकीक म्हणजेच काळ्या रंगाच्या रत्नांबद्दल सांगणार आहोत पुण्यातले ज्योतिषी राजेश जोशी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. काय होतो फायदा? कुंडलीत राहू आणि केतू पीडित असतील तर त्याने खरा दगड धारण करावा. यामुळे राहू केतू शांत राहतो आणि जीवनात सुख-समृद्धीचा संचार होतो. हे रत्न धारण करणे फायदेशीर असते.  तुमचे मन स्वास्थ्य कोणत्यातरी बाह्य नकारात्मक गोष्टींमुळे हरवले आहें असे वाटत असेल तर हे रत्न जरूर वापरावे. नकारात्मक उर्जा दूर करून सकारात्मक उर्जा प्रवाहित करणारे आणि नकारात्मक गोष्टीं पासून बचाव करणारे हे उपरत्न कोणीही वापरण्यास हरकत नाही.

News18लोकमत
News18लोकमत

‘नजर लागणे’ – ‘घात-अपघात ‘ अशा गोष्टीं पासून रक्षण होते. दुर्घटने पासून रक्षण करणे हे या रत्नाचे मुख्य कार्य आहे. सर्व त्रास कष्ट स्वत: घेण्याची याची क्षमता आहे. टुर्मेलीन चा मोठा खडा कुठलीही ऋण उर्जा शोषून घेत असल्याने ऑफीसातल्या दर्शनी भागात किंवा घरात पहिल्या खोलीत दिसेल असा ठेवल्यास याचा नक्कीच फायदा होतो. ‘शांतीदूत ‘ असलेला हा खडा सर्व शरीर शुद्धी करून ताणतणाव नाहीसे करतो. सर्व प्रकारचे कोड, त्रिदोष, पोटाचे रोग, ज्वर, श्वास, क्षय, प्रमेह, वीर्यदोष,  निवारणासाठी मदत करतो,’ असं राजेश जोशी यांनी सांगितले. मृत व्यक्ती स्वप्नात येते? काय असतो नेमका अर्थ काय आहेत नियम? काळा रत्न घालण्याचे अनेक नियम शास्त्रात सांगण्यात आले आहेत. मंगळवार किंवा शनिवारी सूर्योदयापूर्वी लॉकेट किंवा अंगठीमध्ये हे रत्न घालावे. हे धारण करताना शनि, मंगल देव यांचे स्मरण करावे. या दरम्यान शनिचा बीज मंत्र- ओम प्राण प्री प्रौं स: शनैश्चराय नमः आणि मंगळाचा बीज मंत्र- ओम क्रीं क्रौं स: भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हे  रत्न चांदीच्या धातूमध्ये परिधान केले पाहिजे, आणि त्याचे वजन 8 ते 10 रत्ती असावे. हे रत्न धारण केल्यानं राहू, केतू आणि शनी यांचा अशुभ प्रभाव कमी होतो. ते धारण केल्याने व्यक्तीची अध्यात्मिक कार्यात रुची वाढते. ज्या लोकांना झोपेचा त्रास होतो ते देखील हे रत्न घालू शकतात, असं जोशी यांनी स्पष्ट केलं.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात