डोंबिवली, 18 जुलै : आपल्याला झोपेत वेगवेगळी स्वप्नं पडतात. या स्वप्नांचे अर्थ लावण्याचा आपण प्रयत्न करतो. काहीवेळा या स्वप्नांचे अर्थ कळत नाहीत. झोपल्यानंतर तुमच्या स्वप्नात तुमचे मृत पूर्वज किंवा व्यक्ती दिसत असतील तर तो शूभ संकेत आहे की वाईटची चाहूल ? या संदर्भातील माहिती डोंबिवलीतील ल. कृ. पारेकर गुरुजी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मृत व्यक्ती पहाटे स्वप्नात आल्या तर…. ‘मृत व्यक्ती पहाटे स्वप्नात आल्या तर त्या नेमके काय बोलत आहेत यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. पहाटेची स्वप्नं खरी ठरतात असे शास्त्रात म्हंटले आहे असे पारेकर गुरुजी यांनी सांगितले. त्यामुळे जर ते काही वाईट बोलत असतील तर वाईट घडते मात्र त्यांनी काही चांगले सांगितले असेल तर चांगले घडण्याची शक्यता असते,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.
मध्यरात्री मृत व्यक्ती स्वप्नात आली तर… ‘मध्यरात्री मृत व्यक्ती स्वप्नात आली तर त्याचे विशेष परिणाम होत नाहीत. पण, दिवसा मृत व्यक्ती समोर येत असतील तर मृत्यू जवळ आला आहे, असं मानलं जातं,’ असं गुरुजींनी सांगितलं. श्रावणाआधी चक्क डॉक्टरांच्या स्वप्नात आले महादेव; दिला ‘हा’ संदेश पूर्वजांचे फोटो घरी हवे का? ‘पूर्वजांचे फोटो घरात असू नये. यामुळे त्यांच्या आठवणीत आपण रमतो आणि आपल्या स्वप्नात ते येत राहतात. पूर्वजांचे स्वप्ने पडणे म्हणजेच संकटाची चाहूल लागण्याची शक्यता असते. वर्षातून एकदा श्राद्ध पूजा करावी आणि यावेळी हे फोटो बाहेर काढून त्याची पूजा करावी,’ असंही गुरुजींनी सांगितलं. पूर्वज किंवा मृत व्यक्ती स्वप्नात येणे हे फारसे चांगले नसते. पण, ते कोणत्या उद्देशाने आले आहेत हे पाहणे आवश्यक आहे, असा सल्ला पारेकर गुरुजींनी दिला. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)