मुंबई, 16 मार्च : चैत्र नवरात्रीची सुरुवात बुधवार, 22 मार्च रोजी घटस्थापनेने होणार आहे. यावेळी चैत्र नवरात्र पूर्ण 9 दिवसांची असून 10 व्या दिवशी नवरात्रीचे व्रत साजरे केले जाणार आहे. चैत्र नवरात्री दरम्यान, देवी दुर्गेच्या 9 अवतारांची पूजा केली जाते, त्यांना नवदुर्गा म्हणून ओळखले जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांपैकी एक दिवस दुर्गेच्या विशेष रूपाला समर्पित असतो. या क्रमानुसार, दुर्गेच्या 9 अवतारांची पूजा केली जाते. देवी दुर्गेचे 9 अवतार कोणते? नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या अवताराची पूजा केली जाते? याविषयी काशीचे ज्योतिषाचार्य चक्रपाणी भट्ट यांच्याकडून जाणून घेऊ. धर्म स्थापनेसाठी दुर्गा अवतरली - धार्मिक मान्यतेनुसार या संपूर्ण सृष्टीचा आधार शंकर आणि माता आदिशक्ती आहेत. जेव्हा जगात दानवांचा अत्याचार वाढला आणि सर्वत्र अधर्माचा प्रादुर्भाव झाला, तेव्हा सर्व देवतांनी आदिशक्तीला आवाहन केले. मग देवी दुर्गा प्रकट झाली आणि सर्व देवी-देवतांनी तिला आपली शस्त्रे आणि शक्ती दिली. पर्वतराज हिमालयाने तिला सिंह हे वाहनाचे रूप दिले. देवी दुर्गेचे 9 अवतार - चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गेच्या 9 अवतारांची पूजा केली जाते. देवी शैलपुत्री हा माँ दुर्गेच्या 9 अवतारांपैकी पहिला अवतार आहे. देवी पार्वतीला शैलपुत्री म्हणतात. कारण तिचे वडील पर्वतराज हिमालय होते. यानंतर नवदुर्गेमध्ये देवी ब्रह्मचारिणी, देवी चंद्रघंटा, देवी कुष्मांडा, देवी स्कंदमाता, देवी कात्यायनी, देवी कालरात्री, देवी महागौरी आणि देवी सिद्धिदात्री आहे.
चैत्र नवरात्री 2023: कोणत्या दिवशी कोणत्या नवदुर्गेची पूजा केली जाईल? नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते. 22 मार्च हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. 23 मार्च हा नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. 24 मार्च हा नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते. 25 मार्च हा नवरात्रीचा चौथा दिवस आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. 26 मार्च हा नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केली जाते. 27 मार्च हा नवरात्रीचा सहावा दिवस आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. 28 मार्च हा नवरात्रीचा सातवा दिवस आहे. नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. 29 मार्च हा नवरात्रीचा आठवा दिवस आहे. तिला महाअष्टमी किंवा दुर्गाष्टमी म्हणतात. नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाते. 31 मार्च हा नवरात्रीचा नववा दिवस आहे. याला महानवमी किंवा दुर्गानवमी म्हणतात. हे वाचा - लक्ष्मीची पाऊले अशा घराकडे आपोआप वळतात, आचार्य चाणक्यांनी सांगितलेत 3 उपाय (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

)







