वर्धा, 2 जुलै: सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. हा महिना आपल्यासाठी कसा असेल हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनेकजण राशीचक्रावर आपल्या कुंडलीतील भविष्य पाहत असतात. वृश्चिक राशीच्या मंडळींसाठी जुलै महिना कसा असेल? ग्रहांच्या हालचाली काय सांगतात? दोष असेल तर उपया काय? याबाबतच वर्धा येथील पंडित सतीश शर्मा यांनी माहिती दिली आहे. संघर्षातून यश प्राप्ती वृश्चिक राशी ही राशी चक्रातील आठव्या क्रमांकावर येणारी आहे. जुलै महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या मंडळींना कष्टांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या कार्यामध्ये अडथळे येऊ शकतात. जुलै महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या मंडळींना शनी महाराजांची उपासना करण्याचा सल्ला पंडित सतीश शर्मा यांनी दिला आहे.
नातेवाईकांचा सहवास समाधानकारक जुलै महिन्यामध्ये वृश्चिक राशींच्या मंडळींना मित्रांचा तसेच नातेवाईकांचा सहवास लाभेल आणि तो सहवास समाधानकारक असेल. सोबतच स्वतः आणि कुटुंबियांच्या आरोग्याचे त्रास उद्भवण्याचा संभव आहे. जुलै महिन्यामध्ये या मंडळींना संघर्ष आणि परिश्रमातून यश मिळेल असे सांगितले गेले आहे. तसेच या महिन्याच्या उत्तरार्धात अचानक अडचणी येणार असल्याचे सांगितले आहे. Pisces Horoscope July 2023 : 15 जुलैपर्यंत थांबा, पुन्हा उघडतील नशिबाचे दरवाजे अडचणी आणि उपाय वृश्चिक राशीवर अडीच वर्ष शनी आहे. त्यामुळे या महिन्यात वृश्चिक राशींच्या मंडळींना मानहानी आणि मनस्तापाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून शनी महाराजांची उपासना आणि शनी चालीसाचे पठण करावे. तसेच शनि महाराजांचा जप करण्याचा सल्ला पंडित सतीश शर्मा यांनी दिला आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)