अभिनेत्री करीना कपूरने तिच्या हिरोईन या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते.
अभिनेत्री कंगना रानौतने देखील 'मणिकर्णिका' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले होते.
प्रसिद्ध निर्माती एकता कपूर आणि अभिनेत्री सनी लिओनी यांनी त्यांच्या चित्रपट प्रदर्शनापूर्वी सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले होते.
प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओक याने त्याच्या 'धर्मवीर' चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर सपत्नीक सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले होते.
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिने 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी परिवारासोबत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते.
दीपिका पदुकोण हिने आजपर्यंत अनेकदा मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे. पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी तिने दर्शन घेतले होते.