मुंबई 02 जानेवारी : हिंदू धर्मामध्ये विविध शास्त्रांना फार महत्त्व दिलं जातं. कितीही प्रगत असले तरी आजही काहीजण ज्योतिषशास्त्राला मानतात. जे लोक राशी भविष्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मांची देवता म्हटलं जातं. आपल्या कर्मानुसार शनी फळ देतो. त्यामुळे त्याची वक्रदृष्टी खूप त्रासदायक ठरू शकते. धनसंपत्ती, प्रेम-रोमान्स देणारा शुक्र हा शनीच्या मकर राशीत आहेत. मकर राशीमध्ये शुक्र आणि शनीची युती होत आहे. हा संयोग म्हणजेच युती काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ आहे. ज्योतिषशास्त्रात शनी आणि शुक्र या ग्रहांमध्ये मैत्रीची भावना आहे. म्हणूनच खालील तीन राशीच्या लोकांना या संयोगातून चांगला धनलाभ होऊ शकतो. ‘झी न्यूज’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
Video: 'या' राशीच्या राजकीय नेत्यांसाठी 2023 ठरणार लकी, निवडणुकीत होणार फायदा
1) मेष रास: मेष राशीच्या लोकांच्या व्यवसाय आणि करिअरच्या दृष्टीनं शनी आणि शुक्राची जोडी खूप फायदेशीर ठरू शकते. ज्या व्यक्ती बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. त्याचबरोबर सध्याच्या नोकरीतही बढती मिळू शकते. परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तसंच जे व्यावसायिक आहेत त्यांना मोठ्या ऑर्डर मिळू शकतील.
2) कन्या रास: कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मकर राशीतील शनी आणि शुक्राची युती खूप शुभ आणि चांगलं फळं देणारी आहे. या व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात आश्चर्यकारक सुधारणा दिसून येतील. या व्यक्ती वैवाहिक जीवनात आनंदी राहतील. अविवाहित व्यक्तींना जोडीदार मिळू शकतो. विवाह जुळू शकतो आणि करिअरही चांगलं होईल.
3) तुळ रास: शुक्र हा तूळ राशीचा स्वामी असून शनी-शुक्र हे मित्र ग्रह आहेत. त्यामुळे तूळ राशीच्या व्यक्तींना शनी आणि शुक्राच्या युतीचा भरपूर लाभ देईल. या व्यक्तींचं उत्पन्न वाढू शकतं. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसायात तेजी निर्माण होईल. लग्न होण्याची शक्यता आहे. लग्न न झाल्यास निदान लग्न जुळण्याची तरी शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोतही वाढू शकतात. तुळ राशीच्या व्यक्तींचा समाजात आदर वाढेल.
प्रभात खबरमधील वृत्तानुसार, ज्योतिषशास्त्रात शुक्राला महत्त्वाचं स्थान आहे. हिंदू पंचांगानुसार शुक्राचं संक्रमण मानवी जीवनासाठी खूप फायदेशीर आहे. ज्याप्रमाणे कुंडलीत गुरूचं उच्चस्थानी असणं आवश्यक मानलं जातं त्याचप्रमाणे शुक्राचं बलवान असणंही महत्त्वाचं आहे. शुक्र हा ग्रह संपत्तीचा कारक आहे. या शिवाय, वैवाहिक जीवनात शुक्राची स्थिती चांगली असणं गरजेचं असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rashibhavishya, Zodiac signs