मुंबई, 21 जुलै : प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात नशीबाची साथ आणि भरपूर संपत्ती मिळावी, अशी इच्छा असते. यासाठी मनुष्य कठोर परिश्रम करतो. काही ज्योतिषीय आणि वास्तुशास्त्र उपायही मानवाच्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी फायदेशीर ठरतात. काही उपाय हे प्राणी-पक्षांशी संबंधित आहेत. मात्र, तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ते पाळू नयेत. असे केल्याने आपल्या जीवनात प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा अशाच काही प्राण्यांबद्दल सांगत आहेत, जे आपल्यासाठी शुभ ठरू शकतात. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी या प्राण्यांना पाळणे ठरते फायदेशीर कुत्रा - सनातन धर्मात पशू आणि पक्षी यांनाही देवी-देवतांचे सेवक किंवा वाहन म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार कुत्रा पाळल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते. जर तुम्ही तुमच्या घरात कुत्रा पाळू शकत नसाल तर बाहेरील भटक्या कुत्र्याला रोज नियमितपणे भाकरी खायला घालावी. घोडा - वास्तुशास्त्रात घोड्याला ऐश्वर्याचे प्रतीक मानले गेले आहे, परंतु प्रत्येकाला घरात घोडा पाळणे शक्य नाही. त्यासाठी आपण घरात घोड्याचे चित्र किंवा त्याची मूर्ती ठेवू शकता. ससा - वास्तुशास्त्रानुसार घरात ससा पाळणे खूप शुभ मानले जाते. घरात आनंद आणि समृद्धी आकर्षित करण्याची क्षमता त्यामध्ये असल्याचे सांगितले जाते. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर मासे - असे बरेच लोक आहेत ज्यांना घरात मत्स्यालय (एक्वेरियम) ठेवण्याची आवड आहे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मत्स्यालय असणे शुभ असते. यामध्ये सोनेरी रंगाचा मासा ठेवल्यास घरातील सुख-शांती वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर घरमालकावर येणारी संकटेही ती स्वत:वर घेते. कासव - तुम्ही तुमच्या घरातील एक्वेरियममध्येही कासव ठेवू शकता. कासव हा लक्ष्मीचा प्रतिनिधी मानला जातो. पैसा स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी कासव फायदेशीर मानले जाते. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा बेडूक - बेडूक पाळण्याबाबतही वास्तुशास्त्रात वर्णन आहे, परंतु त्याच्या चंचल स्वभावामुळे पाळणे जवळजवळ अशक्य आहे. यासाठी आपण घरात पितळी बेडूक ठेवू शकतो. हा उपाय आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर ठेवतो. जेव्हा तुम्ही काही कामासाठी घराबाहेर पडाल तेव्हा या बेडकाचा चेहरा पहा, तुम्हाला त्या कामात यश मिळू शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ती सादर केली आहे.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.