जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / व्यापारी-व्यावसायिक उगीच नाहीत चांदीचा हत्ती टेबलावर ठेवत; असे आहेत त्याचे फायदे

व्यापारी-व्यावसायिक उगीच नाहीत चांदीचा हत्ती टेबलावर ठेवत; असे आहेत त्याचे फायदे

व्यापारी-व्यावसायिक उगीच नाहीत चांदीचा हत्ती टेबलावर ठेवत; असे आहेत त्याचे फायदे

वास्तुशास्त्रानुसार चांदीच्या हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने मान-सन्मान आणि कीर्ती मिळते. चांदीचा बनलेला हत्ती ज्योतिष आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप शुभ मानला जातो. त्याविषयी जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जुलै : हिंदू धर्मात चांदीचा हत्ती शुभ मानला जातो. केवळ हिंदू धर्मातच नाही तर वास्तू आणि फेंगशुई शास्त्रातही हत्तीची मूर्ती, चित्र किंवा फोटो ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार हत्तीलाही गणेशाचे रूप मानले जाते. तसेच संपत्तीची देवता लक्ष्मी हत्तीवर स्वार होते. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया घरात चांदीच्या हत्तीची मूर्ती ठेवण्याचे काय फायदे (Silver Elephant) आहेत. घरामध्ये चांदीची हत्तीची मूर्ती का ठेवावी? वास्तुशास्त्रानुसार चांदीच्या हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने मान-सन्मान आणि कीर्ती मिळते. चांदीचा बनलेला हत्ती ज्योतिष आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप शुभ मानला जातो. वास्तूनुसार, चांदी आणि हत्ती दोन्ही नकारात्मकता दूर करतात आणि सकारात्मकता वाढवतात. तसेच घरात आनंदाचे वातावरण राहून व्यवसायात प्रगती होते. हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने कुटुंबात सुख-समृद्धी येते. चांदीच्या हत्तीच्या मूर्तीचे फायदे 1- घर किंवा ऑफिसमध्ये टेबलावर चांदीचा हत्ती ठेवल्याने रखडलेल्या कामाला गती मिळते. उत्तर दिशेला चांदीचा हत्ती ठेवणे खूप शुभ असते. 2- चांदीचा हत्ती लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्याने उत्पन्नाचे स्रोत वाढतात. 3- करिअरमध्ये वारंवार अपयश येत असेल तर अभ्यासाच्या खोलीत डेस्कवर हत्तीची मूर्ती ठेवू शकता. यामुळे मुलांचे मन अभ्यासात चांगले गुंतून राहील आणि करिअरच्या प्रत्येक वळणावर त्यांना यश मिळेल. हे वाचा -  डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर 4- मात्र, हत्तीला योग्य दिशेला ठेवणे महत्त्वाचे आहे. हत्तीची मूर्ती चुकूनही दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. हे वाचा -  ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ती सादर केली आहे.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Religion , vastu
  • First Published :
जाहिरात
जाहिरात