मुंबई, 17 डिसेंबर : देवी लक्ष्मी जर कोणावर प्रसन्न झाली तर रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही आणि लक्ष्मी कोणावर रुष्ट झाली तर ती श्रीमंतांनाही गरीब बनवू शकते. शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या देवी लक्ष्मीला आवडत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच 6 गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्या अज्ञानामुळे लोकांकडून घडतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपणे - आपल्या वेद आणि पुराणांमध्ये, सूर्योदयापूर्वी झोपेतून जागे होणे सर्वोत्तम मानले गेले आहे. आळसामुळे काहीजण सूर्योदयानंतरही बराच वेळ झोपलेले राहतात, जे अजिबात चांगले मानले जात नाही. उशिरा झोपणाऱ्यांवर लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. दुसरीकडे, काही लोक दिवसा विश्रांती घेत नाहीत आणि बहुतेकदा सूर्यास्ताच्या वेळी झोपतात. ही सवय अजिबात चांगली नाही. संध्याकाळ हा पूजेचा काळ मानला जातो, यावेळी झोपणे किंवा आडवे होणे अत्यंत अशुभ आहे. हातावर मीठ घेणे किंवा देणे - काही माणसे अशी असतात की ते मागणीनुसार मीठ देतात आणि स्वतःच मीठ हवे असल्यास ते हातात घेतात. लक्ष्मीला हे अजिबात आवडत नाही. जेव्हा कोणी तुमच्याकडे मीठ मागते तेव्हा ते नेहमी भांड्यात ठेवूनच द्या. चुकूनही कुणाला हातातून मीठ देऊ नका. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की संध्याकाळी कोणाला मीठ देऊ नका आणि कोणाकडूनही मीठ घेऊ नका. जेवणानंतर हात-तोड खरकटे ठेवणे - बहुतेक घरांमध्ये, मुले जेवण झाल्यावर हात धुत नाहीत आणि तोंड स्वच्छ धुत नाहीत आणि फक्त अभ्यासाला बसतात. ही सवय अजिबात चांगली नाही. ज्या घरांमध्ये असे घडते, त्या घरातून लक्ष्मी दूर जाते. तुमच्यासोबत असे होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल, तर हा नियम तुम्ही स्वतः पाळा की जेवल्यानंतर तुम्ही तुमचे हात आणि तोंड स्वच्छ करा आणि घरातील मुलांनाही हे सांगा. शास्त्रातही वाचन-लेखनाच्या साहित्याला खरकट्या हाताने स्पर्श करणे अत्यंत चुकीचे मानले गेले आहे. तुमच्यासोबतही कधी असं घडलंय का? तर समजून जा तुमच्या आजूबाजूला आहे आत्मा जेवण अर्धवट सोडणे - तुम्हीदेखील असे करत का की, तुम्हाला एखादी गोष्ट आठवते तेव्हा तुम्ही जेवण मध्येच सोडून उठता. ही खूप वाईट सवय आहे. माणसाने नेहमी जेवण पूर्ण झाल्यावरच उठले पाहिजे, अन्यथा लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार नाही. जे अन्न मध्येच सोडून उठतात अशा लोकांच्या घरी लक्ष्मी कधीच राहत नाहीत. अशा लोकांवर देवी अन्नपूर्णासुद्धा क्रोधित होते. रात्री केस आणि नखे कापणे - रात्रीच्या वेळी केस आणि नखे कापणे खूप अशुभ मानले जाते. असे मानले जाते की रात्रीच्या वेळी वाईट शक्ती सक्रिय होतात, त्यामुळे रात्री केस आणि नखे कापणे तुमच्यावर वाईट परिणाम करू शकतात. सोबतच माता लक्ष्मीदेखील असे केल्याने दु:खी होते आणि तुम्हाला पैशाची कमतरता भासू लागते. म्हणूनच तुम्हीही हे करा, मग आता हे करणे बंद करा. अघोरींबद्दलच्या गोष्टी: कच्चे मानवी मांस खाण्यापासून ते प्रेताशी शारीरिक संबंधांपर्यंत चंदन चोळल्यानंतर हे करू नका - काही लोक असे आहेत की चंदन चोळल्यानंतर ते थेट देवाला लावू लागतात. हे चांगले मानले जात नाही. चंदन बारीक करून प्रथम एका भांड्यात ठेवा आणि नंतर देवाला लावा. भगवंताच्या अलंकाराच्या संदर्भात शास्त्रात हा नियम सांगितला आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.