जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Tulsi Vivah 2022 : तुळशीच्या लग्नाला काय काय लागतं? तुळशी विवाह पूजा सामग्री यादी इथं पाहा

Tulsi Vivah 2022 : तुळशीच्या लग्नाला काय काय लागतं? तुळशी विवाह पूजा सामग्री यादी इथं पाहा

Tulsi Vivah 2022 : तुळशीच्या लग्नाला काय काय लागतं? तुळशी विवाह पूजा सामग्री यादी इथं पाहा

एकादशीला जो भक्त तुळशीविवाहाचा विधी करतो, त्याला कन्या दानाएवढे पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. दुसरीकडे एकादशीच्या व्रताबद्दल अशी श्रद्धा आहे की, वर्षातील सर्व 24 एकादशींचे व्रत केल्याने लोकांना मोक्ष मिळतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 01 नोव्हेंबर : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीपासून हिंदू धर्मात विवाह इत्यादी शुभ कार्ये सुरू होतात. या दिवशी भगवान विष्णूचे रूप असलेल्या तुळशीशी शालिग्रामचा विवाह करण्याची परंपरा आहे. जो भक्त तुळशीविवाहाचा विधी करतो, त्याला कन्यादानाचे पुण्य मिळते, असे मानले जाते. दुसरीकडे, एकादशीच्या व्रताबद्दल अशी श्रद्धा आहे की, वर्षातील सर्व 24 एकादशींचे व्रत केल्याने लोकांना मोक्ष मिळतो. तुळशी विवाहासाठी अंगणाच्या मध्यभागी तुळशीचे रोप लावले जाते. तुळशीच्या समोर मेहंदी, मोली धागा, फुले, चंदन, सिंदूर, सुहाग वस्तू, तांदूळ आणि मिठाई पूजेच्या साहित्याच्या स्वरूपात ठेवली जाते. तुळशी वृंदावनाच्या शेजारी छानशी रांगोळी काढली जाते. या तुळशीविवाहासाठी काही वस्तू असणे आवश्यक असते. पहा यादी.

Tulasi Vivah 2020 : तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे उपाय; वैवाहिक आयुष्यातील समस्या होतील दूर

पूजेत या वस्तू अर्पण करा पूजेमध्ये मुळा, रताळे, शिंगाडा, आवळा, मनुका, कोथिंबीर, पेरू आणि इतर हंगामी फळे अर्पण करा.

News18लोकमत
News18लोकमत

या गोष्टी पूजेत अवश्य असाव्या एकादशीला पूजास्थळी मंडप उसाने सजवला जातो. भगवान विष्णूची मूर्ती खाली विराजमान करून भगवान विष्णूला मंत्रांनी जागृत करण्यासाठी पूजा केली जाते. Tulsi Vivah 2022 Date : दिवाळीनंतर आता तुळशीचं लग्न कधी? इथं पाहा तिथी आणि शुभ मुहूर्त तुलसी विवाह कथा पौराणिक कथेनुसार, एकदा माता तुळशीने भगवान विष्णूंना क्रोधाने शाप दिला की, तू काळा दगड होशील. या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी देवाने शालिग्राम पाषाणाच्या रूपात अवतार घेतला आणि तुळशीशी विवाह केला. दुसरीकडे, तुळशीला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते. अनेकजण एकादशीला तुळशीविवाह करत असले तरी कुठेतरी तुळशीविवाह द्वादशीच्या दिवशी होतो. अशा परिस्थितीत तुळशी विवाहासाठी एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथींची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात