जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / अधिक महिन्यात का वाचली जाते पोथी? जाणून घ्या परंपरा आणि कारण

अधिक महिन्यात का वाचली जाते पोथी? जाणून घ्या परंपरा आणि कारण

अधिक मासात का वाचली जाते पोथी? जाणून घ्या परंपरा आणि कारण

अधिक मासात का वाचली जाते पोथी? जाणून घ्या परंपरा आणि कारण

अधिक मासात पोथी वाचण्याची प्रथा असून श्रीकृष्णाची आराधना केली जाते.

  • -MIN READ Wardha,Maharashtra
  • Last Updated :

वर्धा, 27 जुलै: दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास यावर्षी 18 जुलै ते 16 ऑगस्ट दरम्यान आहे. तीन वर्षानंतर येणाऱ्या अधिकमासाला पुरुषोत्तम मास, मलमास आणि धोंड्याचा महिना या नावानेदेखील संबोधण्यात येते. अधिक मासात जास्तीत जास्त वेळ पूजा, दानधर्म, तप, उपवास, व्रत यामध्ये खर्च करावा. या गोष्टी केल्याने पुण्य मिळते असे सांगितले जाते. वर्धा येथील एकनाथ महाराज मंदिरात लोक एकत्र येऊन पोथी वाचतात आणि श्रीकृष्णाची आराधना करतात. या परंपरेमागे नेमकी आख्यायिका काय आहे याबाबत ग्रामगीताचार्य पद्माकर पेठकर महाराज यांनी माहिती सांगतिली आहे. काय सांगतात पेठकर महाराज?  अधिक मासाला पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. या मासामध्ये पूजा अर्चना, दानधर्म, किर्तन, या गोष्टी जास्तीत जास्त केल्याने पुण्यप्राप्ती होते असं मानलं जातं. अधिक मासात वाचल्या जाणाऱ्या या पोथी मध्ये दीपदान, अन्नदानाचे महत्व सांगितले आहे. गरजू, भुकेल्याची भूक भागवली किंवा त्याची, अनाथांची सेवा किंवा मदत केली, दान केलं तर त्याचे वेगळेच पुण्य प्राप्त होत असते, असे पेठकर महाराज सांगतात.

News18लोकमत
News18लोकमत

वर्ध्यात पोथी वाचण्याची परंपरा तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या अधिक मासात पोथी वाचण्याची परंपरा अतिशय जुनी आहे. कलियुगात या अधिक मासाचं जास्त महत्त्व आहे. लोक मोठ्या संख्येने देवाधर्माच्या नामस्मरणाकडे आणि धार्मिक गोष्टीकडे वळत आहेत. जिथे जिथे, कीर्तन, शिवपूराण, कथा, हे सप्ताह चालतात, तिथे मोठ्या संख्येने नागरिकांनी जावं आणि लहानांनाही त्याबद्दल कळलं की ही परंपरा यापुढेही जपली जाईल, असे पेठकर महाराज सांगतात. भारत छोडो आंदोलनाआधी महात्मा गांधी या मंदिरात झाले होते नतमस्तक तरुण पिढीही जपतेय वारसा गेल्या कित्येक वर्षांपासून वर्धाकर अधिक मासात पोथी वाचतात. विविध ठिकाणी लोक एकत्रित येऊन की परंपरा जपत आहेत. तसेच ही परंपरा यापुढेही चालत राहावी यासाठी नवीन पिढीही त्यामध्ये सहभागी होत आहे. एकीकडे मोबाईलच्या दुनियेत दंग झालेली आजची आणि येणारी पिढी देखील अधिक मासात पोथी वाचण्याची ही परंपरा कायम ठेवेल हीच अपेक्षा वर्धेकर व्यक्त करतात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात