मेष (Aries) : व्यवसायात नोकरदार आणि सहकाऱ्यांची मदत मिळेल. अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पादन क्षमता वाढेल. नोकरदारांचे सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. उपाय : गायीला हिरवा चारा द्यावा. वृषभ (Taurus) : व्यवसायाशी संबंधित ठोस आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. या निर्णयांचे परिणाम येत्या काही दिवसांत पाहायला मिळतील. कामात काही बदल होण्याचीही परिस्थिती निर्माण होत आहे. नोकरदारांच्या कामावर त्यांचा अधिकारी वर्ग पूर्णपणे समाधानी राहील. उपाय : शिवलिंगावर दूध अर्पण करा.
मिथुन (Gemini) : व्यवसायाशी संबंधित कायदेशीर बाबींमध्ये कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. मार्केटिंग आणि मीडियाशी संबंधित लोकांनी कामाकडे अधिक लक्ष द्यावं. सरकारी नोकरी करणाऱ्यांनी बेकायदेशीर कामांपासून दूर रहावं अन्यथा तुमच्या अडचणी वाढू शकतात. उपाय : शिवलिंगावर दूध अर्पण करावं. शेजारच्या या मुस्लिम बहुल देशात चलनावर गणपतीचा फोटो, पर्वताला ब्रह्मदेवाचं नाव कर्क (Cancer) : व्यावसायिकांना कामात खूप मेहनत घ्यावी लागेल. कठीणप्रसंगी सक्षम व्यक्तीची मदत घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. त्यामुळे तणावाचे वातावरण राहील. उपाय : पिवळ्या वस्तू दान करा. सिंह (Leo) : व्यवसायातील परिस्थिती लवकरच तुमच्यासाठी अनुकूल होईल. तुम्हाला तुमची प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळेल. व्यवसायात गुंतवणूक कराल. ऑफिसमधील गैरसोयीमुळे नोकरदारांवर ताण येईल. उपाय : मुंग्यांसाठी पीठ ठेवा. Vastu: पैशांच्या पाकिटात या गोष्टी ठेवण्याची सवय करू शकते तुम्हाला भिकारी कन्या (Virgo) : आपल्या क्षेत्रातील सार्वजनिक व्यवहार आणि विपणनाशी संबंधित कामाकडे लक्ष द्या. बहुतेक कामं फोनद्वारे पूर्ण होतील. यंत्रसामग्री, उत्पादक आदी व्यावसायिकांना काही नवीन ऑर्डर मिळतील. ऑफिसमध्ये अनेक कामं एकाच वेळी सांभाळावी लागतील. उपाय : गरजूंना मदत करा. तूळ (Libra) : व्यवसायात परिस्थिती सामान्य राहील. उत्पन्नाची साधनं वाढतील; पण त्याचबरोबर खर्चाची स्थितीही तशीच राहील. तुम्ही लगेच घेतलेले निर्णय सकारात्मक असतील. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी काही विषयावर मतभेद होऊ शकतात. उपाय : शिवचालिसा पठण करा. भाग्यवान लोकांना स्वप्नात या गोष्टी दिसतात; नशीब पालटण्याचे ते संकेत असतात वृश्चिक (Scorpio) : व्यवसायातील कामं तुमच्या इच्छेनुसार पूर्ण होतील. उत्पन्नाचं साधनही चांगलं राहील. महिलांनी आपल्या करिअरबाबत विशेष काळजी घ्यावी. ऑफिसमधील ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. उपाय : मुंग्यांसाठी पीठ ठेवा. धनू (Sagittarius) : व्यवसायात नवीन उपक्रम सुरू होतील. परंतु, एखाद्या छोट्याशा चुकीमुळे डील रद्द होऊ शकते, हे लक्षात ठेवावं. कामात बदल करताना काळजी घ्या. उपाय : नियमित योगा करा. मकर (Capricorn) : व्यवसायात पैशांअभावी काम ठप्प होईल; पण त्याला पुन्हा गतीसुद्धा मिळेल. व्यवसायात प्रॉपर्टी डीलिंगशी संबंधित चांगले व्यवहार होण्याची शक्यता आहे. नोकरदारवर्गाने त्यांच्या कामावर पूर्ण निष्ठा ठेवावी. भद्र राजयोग या 3 राशीच्या लोकांना मालामाल करणार; बुधाची राहील विशेष कृपा उपाय : भगवान श्रीकृष्णाचं पूजन करा. कुंभ (Aquarius) : व्यवसायात चढ-उतार जाणवेल. मेहनतीनुसार चांगले परिणाम दिसू शकतात. अडकलेले पैसे मिळाल्याने आर्थिक स्थिती सामान्य राहील. सरकारी नोकरी करणाऱ्यांना सार्वजनिक कामांत अडचणी येऊ शकतात. उपाय : श्री लक्ष्मीची पूजा करा. मीन (Pisces) : व्यवसायात नवीन करार होऊ शकतात. उत्पन्नात सुधारणा होईल. पेपर वर्क करताना निष्काळजीपणामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. कामाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करा. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. उपाय : श्री लक्ष्मीची पूजा करा.