मुंबई, 20 मार्च: आज दिनांक २० मार्च २०२३ सोमवार .आज फाल्गुन कृष्ण चतुर्दशी.. शिवरात्र. अमावास्या प्रारंभ रात्रौ १.नंतर.आज चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करेल. चंद्र शनि विष योग बनेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.
मेष ः- धार्मिक कार्यक्रम आणि कौटुंबिक जबाबदारी येऊ शकते. खाण्या पिण्याची काळजी घ्या. वस्तू सांभाळा. घरात आवराआवर करण्यात वेळ जाईल. चंद्र भ्रमण आर्थिक आणि कौटुंबिक दृष्ट्या मध्यम फळ देईल. दिवस शुभ
वृषभ ः- मनाची एकाग्रता वाढेल. ठरविलेले काम पूर्ण होईल. आत्मविश्वासाने पुढे जात रहा. खर्च जपून करा. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. प्रवास होईल. द्वितीय मंगळ जपुन राहण्याचे संकेत देत आहे. दिवस मध्यम.
मिथुन ः- धंद्यात जम बसेल. मागील येणे वसूल करा. कला क्षेत्रात झालेली ओळख फायदेशीर ठरेल. घरामध्ये जबाबदारी वाढेल. मातृ चिंता सतावेल. दिवस चांगला.
कर्क ः- वरिष्ठांना न दुखावता तुमचे मत त्यांना सांगा. कायद्याचे पालन करा. गोड बोलून धंदा मिळवा. संतती कडे लक्ष द्या. तसेच प्रवास आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. दिवस मध्यम.
सिंह ः- दौर्यात ताणतणाव होऊ शकतो. खाण्याचे हाल होतील. प्रवासात नवीन ओळख होईल; पण सावध रहा. कौटुंबिक जबाबदारी येईल. प्रकृती जपा .मात्र आर्थिक दृष्ट्या दिवस उत्तम .
कन्या ः- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. घरातील लोकांना खूश करण्यासाठी प्रयत्न कराल. गोड खाण्यास मिळेल. शनि चंद्र योग मध्यम फळ देईल. प्रकृती उत्तम राहील . वैवाहिक जीवन आनंदी राहील. दिवस बरा .
तूळ ः- ईश्वरी चिंतनात मनाची एकाग्रता होईल.कार्यालयात मन द्विधा करणारी बातमी मिळेल. खर्च आणि नुकसान त्रस्त करतील. प्रवास योग येतील. परदेश संबंधी व्यवहारात यश मिळेल. दिवस मध्यम.
वृश्चिक ः- मनावरील ताण हलका होईल. मौज-मजा कराल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. नवीन ओळख होईल. चंद्र शनी योग वाहन सुख देईल. आर्थिक लाभ . दिवस शुभ.
धनु ः- रागावर ताबा ठेवा. तुमच्यावर आरोप होण्याची शक्यता आहे. चंद्र मानसिक शांतता नष्ट करेल.. खर्च होईल .कार्यालयीन कामकाज सुरु राहील. जास्त दगदग टाळा. दिवस बरा.
मकर ः- कुटुंबात आनंदी रहाल. चांगली बातमी मिळेल. धंदा वाढेल. महत्त्वाचे काम आजच करून घ्या. चंद्र शनि योग घरात कष्ट देईल. प्रवास योग येतील. मात्र खर्च होतील. दिवस भाग्यकरक.
कुंभ ः- तुमच्या विचारांना प्रतिसाद मिळण्यास वेळ लागेल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. वाहन जपून चालवा. प्रवास योग येतील .आर्थिक व्यय होतील. आज चंद्र नातेवाईकांची भेट घडवेल. दिवस मध्यम.
मीन ः- महत्त्वाची भेट टाळा. चर्चा यशस्वी होणार नाहीत. कला-साहित्यात यश मिळेल. आनंदी रहाल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. संतती सुख मिळेल. मिळून खरेदी कराल . दिवस शुभ.
शुभम भवतू!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion