मराठी बातम्या /बातम्या /religion /

हे 8 गुण असलेली माणसं कधीच दु:खी नाहीत होऊ शकत; काय सांगते विदुर नीति?

हे 8 गुण असलेली माणसं कधीच दु:खी नाहीत होऊ शकत; काय सांगते विदुर नीति?

आनंदी जीवनाच्या टिप्स

आनंदी जीवनाच्या टिप्स

विदुर हे महाभाराताच्या काळात हस्तिनापूरचे महाराज धृतराष्ट्र यांचे सावत्र भाऊ होते. महाभारतातील महान अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 30 नोव्हेंबर :  भारतात प्राचीन ग्रंथ हे तत्वज्ञांनाची खाण आहेत. भारतात अनेक ऋषीमुनी, तपस्वी, महाराज, तत्वज्ञ यांनी आदर्श जीवनाचा वस्तू पाठ घालून दिला आहे. त्यांच्या या ज्ञानाचं जतन अनेक ग्रंथ आणि पुस्तकांमध्ये केलेलं आहे. त्याच्या अभ्यासाने चांगलं आयुष्य जगण्याचा मार्ग आपल्याला मिळू शकतो.

विदुर हे महाभाराताच्या काळात हस्तिनापूरचे महाराज धृतराष्ट्र यांचे सावत्र भाऊ होते. महाभारतातील महान अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या जन्म एका दासीच्या पोटी झाला. विदुर नीति म्हणजे माहाभारताच्या युद्धपूर्वकाळात विदुर आणि धृतराष्ट्र यांच्यात झालेला मार्मिक संवाद आहे. विदुर नीतिमध्ये सांगितलेल्या त्तवज्ञांची माहिती आपण घेऊयात.

विदुर नीतिनुसार ज्या व्यक्तीकडे 8 गुण असतील त्याचं समाजात नेहमी कौतुक होतं. तो व्यक्ती आनंदी जीवन जगतो, ते गुण कोणते जाणून घेऊयात.

1 बुद्धी – आयुष्यात तोच माणूस यशस्वी होतो. जो आपल्या बुद्धीचा योग्य वेळी योग्य प्रकारे वापर करतो. अविचाराने कृती करणाऱ्या व्यक्तीच्या हाती केवळ अपयश येतं.

2 शालीनता - ज्या व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यात सरळपणा असतो. ते लोकांचे आवडते असतात. त्यांना समाजात सन्मान मिळतो.

3 संयम - मनावर आणि शरीरावर सयंम असायला हवा. ज्या व्यक्तींचा आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा आहे. ज्यांचा आपल्या शब्दांवर ताबा आहे. अशा व्यक्ती महान असतात. ते स्वत: बरोबर इतरांनाही मार्गदर्शन करतात.

4 ज्ञान - ज्ञानामुळे कोणत्याही अडचणीवर मात करता येते. कितीही मोठी समस्या असेल तिच्यावर ज्ञानाच्या बळावर विजय मिळवता येतो. ज्ञानी लोकांचं सगळीकडे कौतुक होतं.

5 पराक्रम - पराक्रमी माणसं प्रत्येक काम धाडसाने करतात. ते आपल्या कर्तृत्वावर प्रसिद्धी मिळवतात. कठीण प्रसंगातही पराक्रम गाजवतात आणि दुसऱ्यांनाही मदत करतात.

6 मितभाषीपणा - ज्या व्यक्ती विचारपूर्वक बोलतात त्यांना समाजात सन्मान मिळतो. याउलट ज्यांना कधी काय बोलावं याच भान नसतं अशा लोकांना दु:खाचा, संकटांचा सामना करावा लागतो.

7 दानधर्म – दान जगातलं सगाळ्यात मोठं पुण्यकर्म आहे. जे लोक आपल्या क्षमतेप्रमाणे इतरांना दान करतात. त्यांची प्रगती होत राहते. समाजातही त्यांना मान असतो.

हे वाचा -  आजपासून सुरू झालं अग्नीपंचक; चुकूनही अशी कामं नका करू, आयुष्यभर कराल पश्चाताप

8 उपकारांची जाणीव - कधीकधी आयुष्यात इतरांची मदत घेण्याची गरज पडते. त्यावेळी घेतलेल्या मदतीची जाणीव ठेवून जे इतरांना मदत करतात. दुसऱ्यांच्या दु:खात अडचणीत धाऊन जातात त्यांना समाजात प्रसिद्धी मिळते.

First published:

Tags: India, Lifestyle, Religion