मुंबई, 24 नोव्हेंबर : हिंदू धर्म आणि ज्योतिष शास्त्रात पंचक हा काळ शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो. पंचक काळातही काही कामे पूर्णपणे निषिद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात पाच दिवसांचे पंचक असतात. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पंचक होणार असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. अशा वेळी पंचक सुरू होण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्या पंचक काळात लक्षात ठेवाव्यात. नाहीतर पंचकातील काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे आयुष्यभर पश्चातापाचे कारण ठरू शकते. नोव्हेंबरमध्ये अग्नी पंचक झी न्यूज हिंदी ने दिलेल्या वृत्तानुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये होणारे पंचक म्हणजे अग्नि पंचक आहे. मंगळवारपासून पंचक सुरू होते तेव्हा त्याला अग्नि पंचक म्हणतात. यावेळी पंचक 29 नोव्हेंबर, मंगळवारपासून सुरू होईल आणि 4 डिसेंबर, रविवारी रात्री संपेल. या 5 दिवसांमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण ज्योतिषशास्त्रात अग्नि पंचक अशुभ मानले जाते. या काळात कोणतेही शुभ कार्य करू नका, तसेच इतर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. अग्नी पंचक काळात ही कामे करू नका - - अग्नी पंचकामध्ये आग लागण्याची भीती अधिक असल्याचे मानले जाते. अशा वेळी आगीची विशेष काळजी घ्यावी. विशेषत: या पंचकांमध्ये कोणत्याही प्रकारची मशीन, शस्त्रे, बांधकामाशी संबंधित वस्तू खरेदी करू नका.
- पंचक काळात लाकूड, लाकूड साहित्य, इंधन खरेदी करू नका. - खाट, पलंग खरेदी करणे, घराचे छत बसवणे किंवा घराचे बांधकाम सुरू करणे अत्यंत अशुभ ठरेल. - पंचकच्या 5 व्या दिवशी दक्षिण दिशेला प्रवास करणे टाळावे. दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते. पंचकमध्ये या दिशेने प्रवास करणे घातक ठरू शकते. अग्निपंचकात मंगळाशी संबंधित गोष्टी सावधगिरीने वापरा. तसेच रागावर नियंत्रण ठेवा. वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)