मुंबई, 13 फेब्रुवारी : अवघ्या जगाला अहिंसा आणि करुणेची शिकवण देणारे महात्मा गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म लुम्बिनी, नेपाळ येथे इसवी सनपूर्व ५६३ मध्ये एका राजघराण्यात झाला. त्यांचे अमूल्य विचार समस्त मानवांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि पुढे जाण्याची प्रेरणा देतात. बौद्ध धर्माला मानणारे लोक भारतासह जगभरात विखुरले आहेत. जर तुम्हाला तुमच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश हवा असेल आणि जीवन चांगल्या पद्धतीने जगायचे असेल तर महात्मा बुद्धांचे अनमोल वचन एकदा नक्की वाचले पाहिजेत. तथागतांच्या मते, माणूस जसा विचार करतो, तसाच तो बनत असतो. जर एखादी व्यक्ती वाईट विचार करत असते किंवा वागत असे, तर त्या व्यक्तीला फक्त दु:खच वाट्याला येते. म्हणूनच मानवाने शुद्ध विचार, आचार अंगीकारला पाहिजे. चांगले बोलले किंवा वागले तर त्याला जीवनात आनंद मिळेल. हाच खरा आनंद आहे, जो माणसाची साथ कधीच सोडत नाही. महात्मा गौतम बुद्धांनी म्हटले की, आयुष्यात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले. जर तुम्ही स्वतःवर विजय मिळवला असेल तर विजय नेहमीच तुमचा असेल. ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. गौतम बुद्ध म्हणतात की, माणूस कधीही वाईटाने वाईट नाहीसे करू शकत नाही. श्रीकृष्णाच्या मुकुटात विराजमान असलेले मोरपीस घरात ठेवावे की ठेवू नये ?वाईट संपवण्यासाठी प्रेमाची मदत घ्यावी लागते. प्रेमाने जगातील सर्व महान गोष्टी जिंकता येतात. महात्मा बुद्धांच्या म्हणण्यानुसार, भविष्याची स्वप्ने पाहून निराश होऊ नका. भूतकाळाची आठवण करून पश्चात्ताप करण्यापेक्षा वर्तमानात जगणे केव्हाही चांगले. आनंदी राहण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. जसा जळणारा दिवा हजारो लोकांना प्रकाश देतो, त्याचप्रमाणे आनंद वाटून प्रेम वाढते. बुद्धांच्या मते, आनंद नेहमी वाटून घ्यावा, तो कधीही कमी होत नाही. तथागतांच्या मते, एखाद्याने जंगली प्राण्यापेक्षा कपटी आणि दुष्ट मित्राची भीती बाळगली पाहिजे. एखादा जंगली प्राणी भलेही तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकतो, पण वाईट मित्र तुमच्या बुद्धीला हानी पोहोचवू शकतो. गौतम बुद्धांच्या मते जीवनातील तीन गोष्टी कधीही लपवून ठेवता येत नाहीत. त्या म्हणजे सूर्य, चंद्र आणि सत्य आहेत. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.