मुंबई, 27 नोव्हेंबर : सध्याच्या काळात प्रामाणिक, एकनिष्ट लोक खूप कमी पाहायला मिळतात. कोणावर विश्वास ठेवणं ही खूप कठीण झालय. एखाद्या व्यक्तीला आपण 100 % नाही तरी काही अंशी अंकशास्त्राच्या माध्यमातून ओळखू शकतो.
जर तुमच्या जन्म दिवसाची बेरीज 9
येत असेल म्हणजेच तुमचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 9,18,27 या तारखेला येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते.
या मुली असतात खूपच लाजाळू; बुद्धीचं नाही तर मनाचं ऐकतात!
समजा जातकाचा जन्मदिनांक हा 18 मे 1991 आहे तर 11 या दिवसाची एक अंकी बेरीज म्हणजे या जातकाचा मूल्यांक होय.
9 हा मूल्यांक
18 = 1+8 =9
9 या अंकाचा ग्रह मंगल आहे .
जाऊन घेऊयात 9 मूल्यांकाच्या लोकांची गुणवैशिष्टये:
आक्रमक स्वभावाची असतात मूल्यांक 9 चे जातक. या तडपदार व्यक्ति असतात. ध्येय पुरती करणारे असतात हे लोक. प्रचंड शक्ति असणारे असतात. पटकन राग येणारे असतात. पराभवाला न घाबरणारे असतात. त्यांच्या बरोबर कोणीच यांच्यासोबत वादविवादात टिकाव धरू शकत नाही. भांडणाला न घाबरणारे असतात. सर्वांचे ऐकतात आणि स्वताच्या मनाचे करतात. अध्यात्म प्रिय असतात. क्षमाशील असतात. चंचल स्वभावाचे हे लोक असतात. यांचा सामाजिक संपर्क यांचा जास्त असतो. यांचा आवाज खूप छान असतो . प्रेमासाठी काहीही करू शकतात . रागात कोणी बोललेल यांना बिलकुल सहन होत नाही. खूप उतावळे असतात .९ मूल्यांकाचे लोक धोकेबाज नसतात. हे लोक वकील,डॉक्टर ,ज्योतिष ,सिविल सर्विस या क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतात. यांना ताप व पोटाचे विकार जास्त असतात. यांनी हनुमान चाळिसा रोज वाचली पाहिजेल. यांना मंगळवार उपवास करणे लाभ कारक ठरू शकते .
9 मूल्यांकाचा
शुभ अंक - 1,3,5,6,9
अशुभ अंक - 4,8,2
शुभ वार - मंगळवार ,गुरुवार,शुक्रवार
अशुभ वार - शनिवार,बुधवार
शुभ रंग - काळा ,लाल,हिरवा,सफेद.
अशुभ रंग - कोणताच नाही.
विकार – ताप, मूळव्याध.
लाभकारी रत्ना - पोवळा.
उपासना – गणपती उपासना ,हनुमानचाळीसा वाचणे .
मूल्यांक 9 चे प्रसिद्ध व्यक्ति -
अक्षय कुमार, सलमान खान, सोनिया गांधी.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Religion