जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Mumbai News : सिद्धीविनायक मंदिराच्या ‘लाडू’बद्दल शेजाऱ्यांची वेगळीच तक्रार VIDEO

Mumbai News : सिद्धीविनायक मंदिराच्या ‘लाडू’बद्दल शेजाऱ्यांची वेगळीच तक्रार VIDEO

Mumbai News : सिद्धीविनायक मंदिराच्या ‘लाडू’बद्दल शेजाऱ्यांची वेगळीच तक्रार VIDEO

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. या मंदिरात तयार होणाऱ्या लाडवाबद्दल शेजाऱ्यांनी तक्रार केलीय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई 15 जून :  मुंबईतील दादर परिसरात असलेलं सिद्धिविनायक मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जगभरातून भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी खास मुंबईत येतात. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंदिराच्या परीसरात दर्शनासाठी मोठी रांग लागलेली असते. सर्व गणेशभक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना एका वेगळ्याच त्रासाचा सामना करावा लागतोय. काय आहे त्रास? सिद्धीविनायकाचे दर्शन घेण्यासाठी दररोज जगभरातून भाविक येतात. या भाविकांना  बाप्पाचा प्रसाद म्हणून खास साजूक तुपातील लाडू देण्यात येतात. मंदिरात तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षालयातच लाडू तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्याचा मंदिराच्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेल्या कामना सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना त्रास होतोय.

News18लोकमत
News18लोकमत

हे लाडू तयार करताना तूप आणि साखरेचा वापर केला जातो. याच तुपाचा सुगंध स्थानिकांची डोकेदुखी झाला आहे. मंदिर परिसरात तयार होणाऱ्या लाडू प्रक्रियेचा धूर, मशिनचा आवाज, वास यामुळे येथील नागरिकांना डोकेदुखी, मळमळ, श्वास घेण्यास त्रास होत आहे. महाराष्ट्रातलं असं मंदिर जे नदीपात्रात आहे उभं, पूर आल्यावर काय होतं? पाहा हा VIDEO सिद्धीविनायक मंदिरात लाडू बनवण्याची प्रक्रिया पूर्वीपासून होते. यापूर्वी ती मंदिराच्या आतील परिसरात छोट्या प्रमाणात होत होती. पण, आता प्रतीक्षालयाच्या जागेतच मोठा कारखाना सुरू झाला असून तिथं लाडू तयार होतात. अंगारकी, संकष्टीच्या निमित्तानं मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यावेळी कारखान्यात काही दुर्घटना घडली तर मोठा अनर्थ होऊ शकतो, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केलीय. ‘आम्ही गेल्या 4 वर्षांपासून या विषयाचा सातत्यानं पाठपुरावा करत आहोत. सिद्धिविनायक मंदिर प्रशान, महापालिका, अग्निशमन दल, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडं आम्ही सोसायटीच्या वतीनं तक्रार केली आहे. त्यानंतरही या विषयावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. आम्हाला देवाचा कोणताही त्रास नाही. पण, येथील कारखान्यामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागतोय. सोसायटीच्या आवारात वयोवृद्ध तसंच लहान मुलांचं फिरणं कमी झालं आहे,’ अशी तक्रार कामना सोसायटीचे अध्यक्ष अरुण माडखोलकर यांनी केली. शेवटच्या श्वासापर्यंत करणार वारी, पाहा 40 वर्षांपासून न चुकता पायी वारी करणाऱ्या आजीची गोष्ट, Video ‘आगामी काळात या भागात एखादे अग्नीतांडव झाले तर त्याला जबाबदार कोण असेल? मंदिर प्रशासनानं हा कारखाना लवकरात लवकर स्थालांतरित करावे, अन्यथा स्थानिकांच्या रोषाला मंदिर प्रशासनाला सामोरं जावं लागेल,’ असा इशारा अरुण यांनी दिलाय. मंदिर प्रशासनाचा प्रतिक्रेयस नकार सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाशी या विषयावर आमच्या प्रतिनिधीनं संपर्क साधला. प्रशासनाकडे याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतरही त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात