रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 14 जून: महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असणारी मंदिरे आहेत. बहुतांश शिव मंदिरे ही उंचावर किंवा नदीच्या काठी असतात. बीड जिल्ह्यात एक मंदिर थेट नदीच्या पात्रात आहे. माजलगाव येथून सिंदफणा नदी वाहत असून या नदीच्या पात्रात श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. या प्राचीन मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी असते. माजलगाव वासियांचे ग्रामदैवत बीड जिल्ह्यातून सिंदफणा नदी वाहते. याच नदीच्या पात्रात माजगाव येथे सिद्धश्वेर मंदिर आहे. अशा प्रकारे नदीपात्रात क्वचितच मंदिरे आढळतात. त्यामुळे या मंदिराला वेगळे महत्त्व आहे. सिद्धेश्वर मंदिर हे माजलगाव वासियांचे ग्रामदैवत आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची वर्दळ असते.
शेकडो वर्षांचा इतिहास सिद्धेश्वर मंदिराचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे. साधारणत: एक हजार वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले असल्याचे मंदिर अभ्यासक सांगतात. मात्र याबाबत संपूर्ण इतिहास आजपर्यंत उलगडलेला नाही. या मंदिराची जडणघडण पेशवेकालीन असल्याचे सांगितले जाते. आता या मंदिराचा जीर्णोद्धार होत असून तो अनेक वर्षांनी होत असल्याचे मंदिर अभ्यासकांनी सांगितले. कसं आहे मंदिर? या मंदिराची जडणघडण पेशवेकालीन आहे. चार फूट रुंद भिंती असून निसर्गातील सर्व वातावरणाशी लढण्याची या मंदिराची क्षमता आहे. या मंदिरात अनेक संत वास्तव्यास असल्याचे देखील सांगण्यात येते. सिंदफणा नदीच्या पात्रात माजलगाव या धरणातून पाणी सोडले जाते. तेव्हा अनेकदा हे मंदिर या पुराच्या पाण्यामध्ये कित्येक दिवस पाण्याखाली देखील राहिले आहे. मात्र मंदिराची जडणघडण ही जुन्या पद्धतीने असल्यामुळे आतापर्यंत मंदिराचे काहीही नुकसान झाले नाही. ज्ञानदेवा गोडी, केली संसारा फुगडी! काय आहे वारकऱ्यांच्या फुगडीचं गुपित? Video जीर्णोद्धाराचे काम या मंदिराचा शेकडो वर्षांमध्ये अनेकदा जीर्णोद्धार झाला आहे. विशेष म्हणजे हे मंदिर नदीपात्रात स्थित आहे. नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर काही दिवस हे मंदिर पाण्याखाली देखील राहिले आहे. त्या मंदिराचे 2015 पासून जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले असून हळूहळू या मंदिर परिसरात विकास कामे मार्गी लागत आहेत, असे मंदिर व्यवस्थापक अभय होके यांनी सांगतिले.