जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Pune News : पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिराचा इतिहास माहिती आहे? तुकोबाच्या पालखीचा असतो मुक्काम, Video

Pune News : पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिराचा इतिहास माहिती आहे? तुकोबाच्या पालखीचा असतो मुक्काम, Video

Pune News : पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिराचा इतिहास माहिती आहे? तुकोबाच्या पालखीचा असतो मुक्काम, Video

पुणे शहरातील ‘या’ मंदिरात संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा दरवर्षी मुक्काम असतो. काय आहे या मंदिराचा इतिहास? पाहूया

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 13 जून : मंदिरांचं शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात विठ्ठलाचं एक खास मंदिर आहे.  पुणे शहराच्या मध्यवस्तीमध्ये नाना पेठेत असलेल्या या मंदिराचं नाव निवडुंग्या विठोबा मंदिर आहे. आषाढी वारीच्या दरम्यान संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा इथं दरवर्षी मुक्काम असतो. काय आहे या मंदिराचा इतिहास? पाहूया काय आहे इतिहास? निवडुंग्या विठोबा मंदिरात संत तुकारामांची पालखी येण्याचे हे 328 वर्ष आहे. निवडूंग्या विठोबाची जी मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे. स्वयंभू म्हणजे काय तर मूर्तीच्या मस्तकी शिवपिंड आहे. गळ्यात तुळशीची माळ आहे, हातात जाणव आणि कमल पुष्प आहे. पांचजन्य शंख आहे आणि जे भृगुरूष्णने विष्णूच्या छातीवर लाथ मारली होती ज्याला ‘वाचलेच’ असे म्हणतात ती देखील निवडूंग्या विठोबाच्या छातीवर आहे. विठोबा मंदिराचे सेवक रविंद्र पाध्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गेली 328 वर्ष संत तुकाराम महाराजांची पालखी या मंदिरात येते.  पालखी विठ्ठल मंदिरात आल्यानंतर सुरुवातीला मंदिरात आत येताना स्वागत केले जाते. त्यानंतर नैवेद्य माऊलींना दाखवून पालखी आतमध्ये घेतात.  यावेळी समाज आरती होते. त्या आरतीमध्ये समाजात शांतता टिकवून रहावी अशी प्रार्थना केली जाते. त्यानंतर भक्तांची दर्शन घेण्यास सुरुवात होते.  दुसऱ्या दिवशी सकाळी परत पूजाअर्चना होते.

News18लोकमत
News18लोकमत

कसं पडलं नावं? निवडुंग्या विठोबा मंदिराच्या परिसरात पूर्वी सर्व निवडुंगाची झाडं होती. त्यावेळी गोसावी समाजातील अनेक मंडळी वारीला जात. त्यांना विठ्ठलानं दृष्टांत दिला. ‘मी या ठिकाणी निवडुंगाच्या झाडात आहे. मला बाहेर काढ’ हा दृष्टांत मिळाल्यानंतर गोसावींनी शोध घेतला, त्यावेळी त्यांना विठ्ठलाची मूर्ती सापडली. त्यामुळे या देवस्थाला निवडुंग विठोबा मंदिर असं ंम्हणतात. माऊलींच्या पालखीत 2000 आयटी वारकरी,कारण ऐकून तुम्हीही व्हाल सहभागी, Video या मंदिरात अजून एक खासियत अशी ती म्हणजे गाभाऱ्यात प्रवेश करताच विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या बाजूच्या भिंतीला बेल्जियम ग्लास बसवण्यात आले आहे. त्या काचेतून पांडुरंगाची अनंत प्रतिबिंब दिसतात.. हजारो प्रतिमा दिसतात ज्याची मोजत करता येत नाही. त्यामुळे अनंत कोटी ब्रम्हांडनायक’ असा विठ्ठलाचा उल्लेख केला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात