प्राची केदारी, प्रतिनिधी पुणे, 13 जून: संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूर कडे प्रस्थान झाली आहे. या पालखी सोहळ्यात राज्यभरातील वारकरी सहभागी होतात. तसेच वेगवेगळ्या दिंड्यांचाही सहभाग असतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत दरवर्षी आयटी दिंडी सहभागी होते. यंदा ही दिंडी पंढरपूरपर्यंत जाणार आहे. विठू नामाचा जयघोष करीत अनेक आयटी क्षेत्रात कार्यरत असणारे या सोहळ्यात सहभागी होत असतात. गत 16 वर्षांपासून आयटी दिंडीचा सहभाग आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यामध्ये गेल्या 16 वर्षांपासून आयटी दिंडी सहभागी होत आहे. माऊलींच्या पालखी सोबत ही दिंडी आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड अशी वारी करतात. या दिंडीत मोठ्या संख्येने आयटी क्षेत्रात कार्यरत असणारे लोक सहभागी होतात. रोज संगणकावर चालणाऱ्या हातात टाळ मृदंग पताका घेतला जातो आणि हरीनामाचा गजर केला जातो.
यंदा आयटी दिंडी पंढरीला जाणार दरवर्षी आयटी दिंडी आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड प्रवास करते. परंतु, यंदा ही दिंडी थेट पंढरपूरपर्यंत जाणार आहे. वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या पदावर काम करणारे 2 हजार लोक या दिंडीत सहभागी होणार आहेत. सोमवारी 700 जण या दिंडीत सहभागी झाले होते. त्यांनी छोटं रिंगण करून विठू नामाचा जयघोष केला तर पुणे ते सासवडच्या टप्प्यात आणखी 400 आयटीतील वारकरी सहभागी होणार आहेत, अशी माहिती दिंडीच्या संयोजक अनामिका मावळे यांनी दिली. धर्म विठोबा कर्म शिवबा घोषवाक्य या वेळेस आयटी दिंडीचं घोषवाक्य हे ‘धर्म विठोबा आणि कर्म शिवबा’ असं आहे. कारण यंदा शिवराज्यभिषेकाला 350 पूर्ण होत आहेत. वारीमध्ये सहभागी होणारे स्वेच्छेने सहभागी होत आहेत. त्यांची itdindee.org या वेबसाईटवर लॉगिन करून अनेक आयटी क्षेत्रातील लोक या सहभागी होत आहेत. दिंडीच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या फंडाचा गरजू मुलांचे शिक्षण किंवा नैसर्गिक आपत्तीसाठी वापर केला जातो, असेही मावळे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अध्यात्मिक ज्ञानाचे धडे, संतांच्या अभंगासह पावलीचे प्रशिक्षण, Video आयटी दिंडीचा उद्देश आयटीच्या क्षेत्रामधील लोकांना वारीची परंपरा कळावी आणि त्याचे महत्व पुढच्या पिढीपर्यंत न्यावे हा आयटी दिंडीचा उद्देश आहे. यामध्ये केवळ महाराष्ट्रीयन नाही तर बाहेरच्या वेगळ्या राज्यातील प्रोफेशनल नागरिक देखील सहभागी होतात.