मराठी बातम्या /बातम्या /religion /या दिवशी लागणार वर्षातील पहिलं सूर्यग्रहण; या राशींसाठी आव्हानात्मक असेल काळ

या दिवशी लागणार वर्षातील पहिलं सूर्यग्रहण; या राशींसाठी आव्हानात्मक असेल काळ

सूर्यग्रहण-चंद्रग्रहण 2023

सूर्यग्रहण-चंद्रग्रहण 2023

हे सूर्यग्रहण भारतातून पाहता येणार नाही. हे सूर्यग्रहण फक्त ऑस्ट्रेलिया, हिंद महासागर, दक्षिण आशिया, प्रशांत महासागर आणि पूर्व आशियामधून पाहता येईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 मार्च : या वर्षी एकूण 4 ग्रहणे होणार आहेत, त्यापैकी 2 सूर्यग्रहण असतील आणि उर्वरित 2 चंद्रग्रहण असतील. वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात होणार आहे. जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. जेव्हा सूर्य चंद्राच्या मागे येतो तेव्हा सूर्यग्रहण होते, ज्यामुळे पृथ्वी दिवसा काही मिनिटे किंवा तासांपर्यंत अंधारमय होते. त्याचबरोबर सूर्यग्रहणाविषयी काही धार्मिक मान्यता आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाचा प्रभाव वेगवेगळ्या राशीच्या लोकांवरही पडतो, त्यामध्ये सुतक कालावधीही महत्त्वाचा असतो. या वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाबद्दल सर्व काही येथे आज जाणून घेऊ.

2023 मध्ये सूर्यग्रहण कधी आहे?

2023 वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी सकाळी 07.04 ते दुपारी 12.29 या वेळेत होणार आहे. हे सूर्यग्रहण भारतातून पाहता येणार नाही. हे सूर्यग्रहण फक्त ऑस्ट्रेलिया, हिंद महासागर, दक्षिण आशिया, प्रशांत महासागर आणि पूर्व आशियामधून पाहता येईल.

सुतक कालावधी वैध असेल की नाही?

ग्रहणाचा सुतक काळ तेव्हाच वैध असतो जेव्हा ते पाहता येते. हे सूर्यग्रहण भारतातून पाहता येणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालही वैध ठरणार नाही. सुतक कालावधी म्हणजे सूर्यग्रहण ज्या काळात होते आणि धार्मिक मान्यतांच्या आधारावर, सुतक कालावधी सुरू झाल्यावर लोकांना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. सुतक कालावधी भारतात वैध राहणार नाही, त्यामुळे सुतक कालावधीचे नियम पाळणे बंधनकारक असणार नाही.

सूर्यग्रहणाचा राशींवर नकारात्मक प्रभाव -

वर्षातील पहिले सूर्यग्रहण काही राशीच्या लोकांसाठी नकारात्मक किंवा अशुभ सिद्ध होऊ शकते. जाणून घ्या या सूर्यग्रहणादरम्यान कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी.

मेष -

मेष राशीत सूर्यग्रहण होत आहे. या राशीमध्ये ग्रहण असेल तर सूर्यग्रहणाचा देखील या लोकांवर खूप प्रभाव पडेल. सूर्यग्रहणामुळे मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तसेच मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे.

कन्या -

कन्या राशीसाठीही हा काळ अनुकूल नसेल, असे सांगितले जाते. या सूर्यग्रहणामुळे कन्या राशीच्या लोकांना वादांना तोंड द्यावे लागू शकते. यामुळे या राशीच्या लोकांनी विशेषतः बोलण्यावर संयम ठेवण्याची गरज आहे.

मकर -

मकर राशीच्या चौथ्या घरात सूर्यग्रहण होणार आहे, त्यामुळे या राशीवरही या ग्रहणाचा जास्त परिणाम होऊ शकतो. फालतू खर्चांची शक्यता वाढू शकते. तसेच आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

सिंह-

सूर्यदेवाला सिंह राशीचा स्वामी मानले जाते. त्यामुळे या राशीवरही सूर्यग्रहणाचा प्रभाव पडणार आहे. सिंह राशीसाठी सूर्यग्रहण चांगले ठरणार नाही, असे सांगितले जात आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या कामाचे शुभ परिणाम मिळण्यात अडथळे येतील आणि अनेक कामे बिघडू शकतात.

हे वाचा - मान-सन्मान-पैसा मिळण्याचे ते संकेत समजा! अशी स्वप्ने पडणाऱ्यांचे पालटते नशीब

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Eclipse, Rashibhavishya