जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / सूर्यग्रहण, चंद्रग्रहण का होतात? समुद्रमंथनाशी संबंधित आहे कथा, राहू-केतूच्या उत्पत्तीचे रहस्य

सूर्यग्रहण, चंद्रग्रहण का होतात? समुद्रमंथनाशी संबंधित आहे कथा, राहू-केतूच्या उत्पत्तीचे रहस्य

सूर्यग्रहण-चंद्रग्रहण 2023

सूर्यग्रहण-चंद्रग्रहण 2023

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणविषयी समुद्रमंथनाशी संबंधित कथा सांगितली जाते. या कथेवरून आपल्याला सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आणि राहू-केतूच्या उत्पत्तीचे रहस्य समजू शकेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 एप्रिल : या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण चैत्र अमावस्येला 20 एप्रिलला होणार आहे, तर 2023 सालचे पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी वैशाख पौर्णिमेला होणार आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे, त्याची गणना आणि परिणाम ज्योतिषशास्त्रातही अभ्यासले जातात. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची कारणे पौराणिक कथांमध्येही सांगितली आहेत. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणविषयी समुद्रमंथनाशी संबंधित कथा सांगितली जाते. या कथेवरून आपल्याला सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आणि राहू-केतूच्या उत्पत्तीचे रहस्य समजू शकेल. जाणून घेऊया समुद्रमंथनाची कहाणी. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कथा - पौराणिक कथेनुसार, देव आणि असुरांनी मिळून समुद्रमंथन केले, ज्यातून हलाहल विष प्रथम बाहेर पडले, जे संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरू लागले. तेव्हा महाकाल शिव-शंकराने ते विष प्यायले, त्यामुळे शंकराला नीलकंठ म्हटले जाऊ लागले. त्या समुद्रमंथनाचा काळ जसजसा वाढत गेला तसतशा अनेक मौल्यवान वस्तू बाहेर आल्या. त्यातून भगवान धन्वंतरी हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले. ते अमृताचे भांडे मिळविण्यासाठी देवता आणि असुरांची लढाई सुरू झाली. देवांना पूर्ण अमृत मिळावे अशी इच्छा होती, जेणेकरून असुर अमर होऊ शकणार नाहीत. दुसरीकडे, राक्षसांना अमृत पिऊन अमरत्व प्राप्त करायचे होते. अमृतासाठी देव आणि दानव यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी भगवान विष्णू मोहिनीच्या रूपात आले.

News18लोकमत
News18लोकमत

राक्षसांनी अमृत वाटण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. मग विष्णू म्हणाले की, आळी-पाळीने सर्वांना अमृत मिळेल. आधी देवांना अमृत दिले जाईल आणि मग दानवांना. राक्षसांनी हे मान्य केले. देवता एका रांगेत तर राक्षस दुसऱ्या रांगेत बसले. भगवान विष्णूंनी मोहिनीच्या रूपात देवतांना अमृत अर्पण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एका राक्षसाला वाटलं की, देवता आपली फसवणूक करू शकतात. त्याला कल्पना सूचली आणि मायावी राक्षसाने देवतेचे रूप धारण केले आणि देवतांच्या पंक्तीत जाऊन बसला. त्यावेळी सूर्यदेव आणि चंद्रदेव यांना त्या राक्षसाचे रहस्य कळले. देव बनलेल्या त्या राक्षसाला विष्णू अमृत देत होते, तेव्हाच सूर्य आणि चंद्रदेवांनी भगवान विष्णूला त्या राक्षसाबद्दल सांगितले. अशा प्रकारे राहू आणि केतू झाले - तेव्हा लगेच विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने त्या राक्षसाचा शिरच्छेद केला. त्या राक्षसाने अमृताचे काही थेंब चाखले होते, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही. त्याचे डोके आणि धड वेगवेगळे जिवंत राहिले. त्या राक्षसाचे डोके आणि धड यांना राहू आणि केतू म्हणतात. राहू आणि केतू यांना नऊ ग्रहांमध्ये छद्म ग्रहांचे स्थान मिळाले आहे. हे वाचा -  उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडण्याचे हे चमत्कारिक फायदे; हसतं-खेळतं राहतं कुटुंब राहू-केतू सूर्य-चंद्र ग्रास करण्यासाठी येतात - या घटनेनंतर, राहू आणि केतू दरवर्षी चंद्र आणि सूर्य ग्रास (खाण्यासाठी) करण्यासाठी येतात. कारण त्या दोघांनी अमृत पिण्याच्या वेळी त्या राक्षसाचे रहस्य उघड केले होते. धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण राहू आणि केतूमुळे होते. सूर्यग्रहण अमावस्येला होते आणि चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होते. हे वाचा -   सरकारी नोकरीचा योग यायला कुंडलीत ग्रहांची ‘अशी’ बैठक जुळायला लागते (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात