मराठी बातम्या /बातम्या /religion /सूर्य गोचर 2023 : सूर्य-शनीचा संयोग या चार राशींवर अशुभ प्रभाव देणारा ठरेल!

सूर्य गोचर 2023 : सूर्य-शनीचा संयोग या चार राशींवर अशुभ प्रभाव देणारा ठरेल!

सूर्याचे राशीपरिवर्तन

सूर्याचे राशीपरिवर्तन

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य ग्रहाचा मकर राशीत प्रवेश 14 जानेवारीला रात्री होईल. सूर्य शनी ग्रह मकर राशीत एकत्र येण्यामुळे सिंह, तूळ, धनू, कुंभ या राशींवर अशुभ प्रभाव पडेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 जानेवारी : सूर्य गोचर 2023: 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. सूर्याचे मकर राशीत येण्यामुळे सूर्य आणि शनीचा संयोग होईल. त्याचसोबत शुक्र ग्रह पण मकर राशीत असल्याने मकर संक्रांतीला त्रिग्रही योग बनेल. हा योग खूप दुर्लभ योग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य ग्रहाचा मकर राशीत प्रवेश 14 जानेवारीला रात्री होईल. सूर्य शनी ग्रह मकर राशीत एकत्र येण्यामुळे सिंह, तूळ, धनू, कुंभ या राशींवर अशुभ प्रभाव पडेल.

सिंह राशीवर मकर संक्रांतीचा प्रभाव :

सिंह राशीच्या लोकांनी आर्थिक गोष्टींबाबत अधिक जागरूक राहिले पाहिजे, यावेळेस कोणालाही पैसे उधार देऊ नये, असे केल्यानं आर्थिक संकट येईल, या वेळेत तुम्हाला तुमच्या आजोळमधून काही अप्रिय बातमी मिळू शकते. ज्यामुळे तुम्ही दुखी व्हाल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या.

तूळ राशीवर मकर संक्रांतीचा प्रभाव :

तुळ राशीचा हा काळ खूपच परिश्रमाचा जाईल. या कालावधीत तुमच्या घरात खूप मतभेत होऊ शकतात. त्यामुळे तुमची मानसिक स्थिती अशांत राहील. या दिवसात तुम्हाला तुमच्या प्रियजणांकडून काही अप्रिय बातमी मिळू शकेल, त्यामुळे तुम्ही उदास राहाल. या काळात चोरी होण्याची शक्यता आहे.

धनू राशीवर मकर संक्रांतीचा प्रभाव:

या काळात तुम्हाला काही अप्रिय गोष्टीचा सामना करावा लागेल. या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. तुम्ही तुमच्या तब्येतीची अधिक काळजी घ्या. तुम्हाला डोळ्यांचे विकार होण्याची शक्यता आहे.

कुंभ राशीवर मकर संक्रांतीचा प्रभाव :

तुमच्यावर कामाचा खूप दबाव असेल. तुमच्यावर खूप मानसिक तान असेल. या दरम्यान तुमचे खर्च ही अधिक मोठ्या प्रमाणावर होतील. कोणाकडूनही उधार घेऊ नये, त्यामुळे आर्थिक संकट येईल.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Makar Sankranti 2023, Rashibhavishya, Rashichark, Religion