मुंबई, 28 जुलै : हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. घर बांधण्यापासून ते सजावटीपर्यंत (इंटिरिअर) वास्तूशास्त्राची काळजी घेतली जाते. घर बांधल्यानंतर त्यात लावलेली झाडे, वस्तूंची देखभाल इत्यादी गोष्टी वास्तूमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. त्याचप्रमाणे इतरही काही उपाय केले जातात, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते. पाणी शिंपडण्याचे काही प्रयोगदेखील खूप शुभ मानले जाते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया घराच्या दारात/उंबरठ्यावर पाणी शिंपडण्याचे उपाय आणि फायदे. दरवाजात पाणी शिंपडा : वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजात पाणी शिंपडणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की दररोज सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर घराच्या मुख्य दारावर तांब्याच्या कलशात पाणी शिंपडावे. हा उपाय केल्याने घरात सुख-समृद्धी आणि धन-धान्य वाढते. त्यामुळे घरातील कलह कमी होतो. घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते.
दरवाजात मिठाचे पाणी शिंपडा : वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा घराच्या मुख्य दरवाजात मिठाचे पाणी शिंपडावे. असे मानले जाते की मीठ नकारात्मकता दूर करते. यासोबतच खारट पाणी शिंपडून रोग, दोष इत्यादी सर्व दूर ठेवता येतात. त्यामुळे तुम्हीही हा उपाय अवश्य करा. या जन्मतारखांच्या महिला असतात मेहनती! कुटुंबाची एकहाती करू शकतात प्रगती दारात हळदीचे पाणी शिंपडा : वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर हळद मिसळलेले पाणी शिंपडणे खूप शुभ असते. रोज सकाळी उठल्यावर आंघोळ करून तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात चिमूटभर हळद टाकावी. त्यानंतर हे पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडा. असे केल्याने आजूबाजूचे वातावरण निरोगी राहते, तसेच घरात धन-संपत्तीची कमतरता भासत नाही. घरात पितृदोष असेल तर असे संकेत वारंवार दिसतात; सोमवती अमावस्येला करा हे उपाय (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)